file photo 
नांदेड

कर्जमाफीच्या रक्कमेसह आधार क्रमांकातही चुका....कुठे ते वाचा

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्याचे काम ‘सीएससी’मार्फत बुधवारपासून (ता. १७) सुरु झाले. यावेळी कर्ज खात्यावरील रक्कम जास्त तर माफीच्या यादीत कमी दिसत आहे. सोबतच आधार क्रमांकातही चुका असल्यामुळे शेतकऱ्यांनी पोर्टलवर यादी अमान्य असल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

दोन लाख १४ हजार खातेदार पात्र
जिल्ह्यात शासनाच्या महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकरी पात्र ठरले आहेत. या पात्र कर्जखात्यापैकी आजपर्यंत दोन लाख १२ हजार ७५९ खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर पोर्टलवर एक लाख ८० हजार ४३८ खाते अपलोड केले आहेत. 

एक लाख ६३ हजार कर्जखाते पोर्टलवर
अपलोड केलेल्या कर्जखात्यापैकी एक लाख ६३ हजार ९४३ कर्जखाते पोर्टलवर प्रसिध्द करुन खातेदारांना आधार प्रमाणीकरणाचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रारंभी कोरोनामुळे बॅंक तसेच सीएससी केंद्रावर गर्दी होइल, यासाठी पोर्टल बंद केले होते. परंतु बुधवारपासून (ता. १७) पोर्टल पुन्हा सुरु करण्यात आले. यावेळी कर्जमाफीस पात्र शेतकऱ्यांना आधार क्रमांकासह कर्जखाते क्रमांक, कर्जाची रक्कम, खातेदाराचे नाव आदी बघून त्यात काही चुका असल्यास अमान्य तर सर्व बरोबर असल्यास मान्य असल्याचे कळवावे, असे आवाहन केले होते. 

४५ हजार शेतकऱ्यांची सीएससीकडे धाव 
मागील बुधवारपासून शेतकऱ्यांनी सीएससी केंद्राकडे धाव घेतली. या काळात ४५ हजार शेतकऱ्यांनी पोर्टलला भेट दिली. यावेळी पोर्टलवरील कर्ममाफी यादीत कर्जखात्यावरील रक्कम अधीक तर पोर्टलवरील यादीत ती रक्कम कमी आल्याचे दिसून आले. यासोबतच आधार क्रमांकात चुका असल्याचे निदर्शनास आल्याने सव्वादोनशे शेतकऱ्यांनी यादी अमान्य केली आहे. मान्य केलेले खात्याची माहिती शासनाला कळविण्यात येणार आहे. यानंतर आगामी काही दिवसात शासनाकडून रक्कम खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. 

‘डीएलसी’समोर होणार सुनावणी
पोर्टलवरील कर्जाची रक्कम अथवा इतर बाबीबाबत होणाऱ्या तक्रारीची सुनावणी जिल्हास्तरीय समितीसमोर जिल्हाधिकारी डॉ. विपीन घेणार आहेत. यावेळी कर्जाची रक्कम, आधार क्रमांक, खाते क्रमांक, खातेदाराचे नाव याबाबत बॅंकासमोर सुनावणी होवुन कर्जमाफी खातेदारांच्या तक्रारी निवारण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New CJI Appointment 2025 : कोण होणार देशाचे नवे सरन्यायाधीश? बीआर गवई यांनी केली नावाची घोषणा...

Anna Hazare : ''माझी गाडी लोक वर्गणीतून घेतलेली, लोकपाल सदस्यांना कशाला हव्यात महागड्या गाड्या?'', अण्णा हजारेंनी व्यक्त केली नाराजी...

Parner News : गडरक्षण हीच खरी शिवसेवा! खासदार छत्रपती शाहु महाराज

SIR ECI PC: निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद गाजणार! १५ राज्यांसाठी SIR तारखा जाहीर होणार, पण कधी?

Ranji Trophy: अंजिंक्य रहाणेचं दीडशतक, मुंबई ४०० धावा पार; महाराष्ट्रासाठी विकी ओत्सवालच्या ६ विकेट्स, मिळवून दिली मोठी आघाडी

SCROLL FOR NEXT