फोटो 
नांदेड

Motivation story : शेतकरी पुत्राच्या यशाने बारूळकरांची मान उंचावली

सकाळ वृत्तसेवा

बारूळ (ता. कंधार) : कंधार तालुक्यातील बारूळ येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षण, त्यांनतर सैनिकी शाळा सगरोळी येथे उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण घेऊन वैद्यकीय अधिकारी आणि आपल्या अखंड खडतर प्रयत्नाने व आपल्या शेतकरी पण सुज्ञ पालकाच्या पाठिंब्याने दोन वर्षांपूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आता यशाची मुहूर्तमेढ रोवली असून विश्वनाथ दिगंबर पाटील वडजे नुकत्याच लागलेल्या एमपीएससीच्या निवड यादीत पोलिस उपधीक्षक पदी निवड झाली.

बारूळ येथील थेट या पदावर निवड होणारे हे पहिलेच असल्याने बारूळ वासियांची मान अभिमानाने निश्चितच उंचावली आहे. त्यामुळे त्यांचे व त्यांच्या शेतकरी आई वडिलांवर सर्वच परिसरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तसेच या यशानंतर येथील सुशिक्षित तरुणांचे ते आयडियल बनले असून त्यांची अशीच प्रगती होत जावी व गावकऱ्यांची मान उंचवावी अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल माजी आमदार शंकर धोंडगे, बारूळचे सरपंच शंकरराव नाईक, जिल्हा परिषद सदस्य विजय धोंडगे व परिसरातील प्रतिष्ठीत नागरिक पदाधिकारी प्रशासकीय अधिकारी, शाळेतील शिक्षक, पत्रकार, पाहुणे व मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून या शिखरापर्यंत पोहचविले

त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे वडील दिगंबर पाटील वडजे व आई कौशल्याबाई दिगंबर पाटील वडजे यांचेही आशा कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून या शिखरापर्यंत पोहचवणे तसे सोपे नसल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. डॉ. विश्वनाथ वडजे यांचा सध्याच्या तरुण पिढीने आदर्श घ्यावा अशी भावना आता लोक व्यक्त करीत आहेत. तसेच केवळ शेतीत राबून आपल्या मुलाला अशा पदापर्यंत नेऊन पोचवणे यातही बराचसा आपल्या हौसेमौजेचा त्याग ज्या आई वडिलांना करावा लागला त्या त्यागाचे चीज झाल्याची भावना आता त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. त्यामुळे आशा पालकांकडूनही आपला पाल्य कसा घडवावा याचा आदर्श घेण्यासारखाच असतो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raju Shetti Sugarcane FRP : 'स्वाभिमानी'ची नेहमीची भूमिका बदलली! राजू शेट्टी पहिल्यांदाच समतोल भूमिका घेत कारखानदारांच्या भेटीला; नेमक्या मागण्या काय?

AI cough test for TB: खोकल्याच्या आवाजातून कळणार टीबीचा धोका? राजस्थानमध्ये AIच्या मदतीने नवा प्रयोग

कतरिनाचा दीर पडला वहिनीच्या बहिणीच्या प्रेमात? सनी कौशलच्या 'त्या' एका पोस्टने चर्चेला उधाण, Viral

२१ वर्षीय तरुणानं १७ वर्षीय प्रेयसीसोबत नको ते केलं, आई-वडील घरी परतताच लेक अस्वस्थ पडून, तर तरूण...; नवी मुंबईत काय घडलं?

PM मोदींच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची दांडी, IIM जम्मूने ५०० रुपये दंडाची पाठवली नोटीस

SCROLL FOR NEXT