MSEDCL employee who was involved in power theft in Nanded has been beaten up
MSEDCL employee who was involved in power theft in Nanded has been beaten up 
नांदेड

वीजचोरीचा अकोडा काढणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

प्रल्हाद कांबळे

नांदेड : मरघट परिसरात आकोडा टाकून वीज वापरणाऱ्या वीजग्राहकास मज्जाव करत असताना महावितरणचे तंत्रज्ञ श्री विश्वदिप गंगाधर वाघमारे यांना आकडा का काढतोस असे म्हणत राजू भुजबळ याने बेदम मारहाण केली. याप्रकरणी इतवारा पोलीस स्टेशनमध्ये राजू भूजबळ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महावितरण कंपनीकडून सध्या थकीत वीज बिलाची वसुली करण्यात येत आहे. शिवाय आकडे टाकून अवैधरित्या विजेची चोरी करणाऱ्या आरोपींविरूद्ध कारवाई करण्याची धडक मोहीम सुरू आहे. शनिवारी (दि.६) तंत्रज्ञ विश्वदिप वाघमारे शहरातील भावेश्वर नगर, महंतवाडी मरघट परिसरात वीजबील वसुली करत असताना मरघट येथील राजू यादवराव भुजबळ हे विजेच्या तारेवर आकोडा टाकून वीज वापरत असल्याचे दिसून आले.

यावेळी राजू भुजबळ यास आकोडा काढून टाका असे सांगितले. मात्र राजू भुजबळ याने आकोडा काढत नाही तू काय करायचे ते कर असे म्हणत श्री वाघमारे यांना शिवीगाळ करत गालात चापट्या मारण्यास सुरवात केली. त्याचबरोबर धक्काबुक्की करत लाकडाने  मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.  याप्रकरणी वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इतवारा पोलीस ठाण्यात राजू भूजबळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT