file photo 
नांदेड

गुड न्यूज : मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता मुंबई- नांदेड- मुंबई विशेष रेल्वे ता. ११ ऑक्टोबर पासून सुरु करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचा विस्तार किनवटपर्यंत करण्यात आला आहे. ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहे. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही.

गाडी संख्या ०११४१  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस  मुंबई ते हुजूर साहेब नांदेड - हि गाडी दिनांक १२ ऑक्टोबर २०२० पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून रोज सायंकाळी १६. ३५ वाजता सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद,  नांदेड मार्गे किनवट  येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०९.०० वाजता पोहोचेल.

गाडी संख्या ०११४२ हुजूर साहेब नांदेड ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई -- हि गाडी दिनांक १३ ओंक्टोबर २०२० पासून किनवट रेल्वे स्थानकावरून रोज दुपारी १३.३० वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड, औरंगाबाद-मनमाड मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०५. ३५ वाजता पोहोचेल.

ही गाडी दोन्ही दिशेला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा , हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायत नगर, सहस्रकुंड, बोधडी बुज्रुग येथे थांबेल.

या गाडीस एकूण १८ डब्बे असतील. या गाडीत वातानुकूलित प्रथम श्रेणी, वातानुकूलित द्वितीय श्रेणी, वातानुकूलित तृतीय श्रेणी, द्वितीय श्रेणी आरक्षित आणि  आरक्षित सीटिंग डब्ब्यांची सुविधा असेल.

ही विशेष गाडी नियमित रेल्वे गाडी सुरु होईपर्यंतच असेल.

प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधन कारक असेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Beed Voter List: बीडच्या मतदार यादीत चक्क उद्धव ठाकरेंचे नाव! पदवीधर मतदार संघातील उमेदवार दिलीप घुगे यांनी नोंदवला आक्षेप; प्रारूप मतदार यादीत घोळ

Inspirational Story: दोन्ही हात नसतानाही हार मानली नाही; माउली बनली महापालिकेची लिपिक, औक्षणाचा क्षण ठरला भावनिक

Missing Link Accident: मिसिंग लिंकवर काळरात्र! आधी पिकअप पलटी, नंतर बस-ट्रकची जोरदार धडक, ६ ते ७ जण जखमी

Pune MPSC Protest: पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पोलिसांचा दणका; ५१ विद्यार्थ्यांसह २९ खासगी शिकवणी चालकांना नोटिसा

SCROLL FOR NEXT