nanded news 
नांदेड

Video : नगीनाघाटसह गुरुद्वारा परिसर सील

प्रमोद चौधरी

नांदेड : सचखंड गुरुद्वारा लंगर साहेब परिसरातील २० कर्मचरी कोरोना बाधीत झाल्याचा अहवाल शनिवारी (ता.दोन) आल्यानंतर, जिल्हा व महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी सकाळी नगीनाघाट गुरुद्वारा परिसर पूर्णपणे सील करून निर्जंतुकीकरणाची फवारणी केली.  

नगिनाघाट गुरुद्वारा परिसर हा नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दीत येतो. या परिसरामध्ये शनिवारी २० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे नगिनाघाट गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगरसाहेब परिसर, गुरुद्वारा सचखंड गेट क्रमांक एक ते देना बॅंक, तसेच गेट क्रमांक दोन ते सहा परिसर, चिखलवाडी, कनकय्या कंपाउंड, बडपूरा, शहीदपुरा, रामकृष्ण टॉकीज परिसर या क्षेत्रामध्ये कोरोना रोगाचा संसर्ग होऊ नये म्हणून हा परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून शनिवारी जाहीर करण्यात आला आहे. या परिसरातील प्रत्येक नागरिकांच्या हालचालीवर जिल्हा, पोलिस प्रशासन लक्ष ठेवून आहे.

उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या निर्देशानुसार सर्व आवश्‍यक त्या सेवा या भागामध्ये पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहेत. या सेवा महापालिकातर्फे घरपोच देण्यात येतील. त्यासाठी नियंत्रण अधिकारी अधिकारी प्र.कार्यकारी अभियंता सुनील देशमुख यांची नियुक्तीही तत्काळ करण्यात आली आहे. तसेच सहाय्यक अधिकारी म्हणून प्रकाश गच्चे व त्यांचे अधिनस्त कार्यालय अधिक्षक, सुपरवायधर आणि वसुली लिपीकांची नियुक्ती करण्यात आली. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी आदेशात म्हटले आहे.  

नोडल अधिकाऱ्यांशी साधावा संपर्क
गुरुद्वारा लंगर साहेब परिसरातील २० कर्मचारी शनिवारी कोरोनाबाधित झाल्याने गुरुद्वारा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. दरम्यान गुरुद्वारा परिसरातील नागरिकांनी अत्यावश्‍यक सेवेसाठी डॉ. मोहम्मद बदीयोद्दीन (९८२३०१२४५६), डॉ. बळीराम भुरके (९८८११२०८७३), सुनिल देशमुख (९०११०००९६०) आणि प्रकाश गच्चे (८८८८८०१९६०) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी केले आहे. 

११ अहवालांची प्रतिक्षा
नांदेडमध्ये अडकलेले सर्व यात्रेकरू पंजाबकडे रवाना झाल्यानंतर म्हणजे ३० एप्रिल ते एक मे २०२० या कालावधीत गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील ९७ व्यक्तिंचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा अहवाल शनिवारी (ता.दोन) प्राप्त झाला असून त्यात गुरुद्वारा लंगर साहेब येथील २० कर्मचारी हे कोरोना विषाणूमुळे बाधित झाले. त्यांच्या संपर्कातील २५ व्यक्तिंचे अहवाल हे निगेटिव्ह तसेच ११ स्वॅब हे अनिर्णित आहेत. त्यामुळे आता उर्वरीत अहवालांची प्रतिक्षा आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT