उमरज (ता.कंधार, जि.नांदेड) येथील संत नामदेव महाराज मठ संस्थानच्या गोशाळेतील लालकंधारी गायींसह देशी गायी.  सकाळ
नांदेड

देशी गायींच्या संवर्धनाचा वसा! नामदेव महाराज संस्थानचा पुढाकार

हफीज घडीवाला

कंधार ( जि. नांदेड) : महाराष्ट्रासह (Maharashtra) तेलंगणा, कर्नाटक राज्यात प्रसिद्ध असलेले उमरज (ता.कंधार) (Nanded) येथील संत नामदेव महाराज मठ संस्थान अध्यात्माबरोबरच लालकंधारी गायींचे संगोपन केंद्र म्हणूनही ओळखले जाते. संस्थानच्या घागरदरा, उमरज आणि आंध्र प्रदेशमधील (Andhra Pradesh) शाखांमध्ये भाकड गायींचे संवर्धन केले जाते. गोशाळेच्या माध्यमातून या शाखांमध्ये विनामूल्य लालकंधारी गायींची सेवा करण्याचे कार्य श्रद्धेने जोपासले जाते. पशुपालकांसाठी या गोशाळा आधार बनल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुका लालकंधारी जनावरांचे उगमस्थान आहे. या जनावरांना राष्ट्रीयस्तरावर मान्यता आहे. या जनावरांच्या संवर्धनासाठी शासनातर्फे प्रयत्न झाले. तालुक्यातील गऊळ येथे १९८७ मध्ये लालकंधारी जनावरांचे (Lalkandhari Cow) संवर्धन केंद्र स्थापन केले. मात्र पशुसंवर्धन विभागाच्या उदासीनतेमुळे काही वर्षांतच ते बंद पडले. आता येथे पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-एक सुरू आहे. पसुसंवर्धन विभागांतर्गत जिल्हास्तरावर काम करणाऱ्या यंत्रणेकडे देशी गोवंश संवर्धनाची जबाबदारी असते.

सतराव्या शतकात स्थापन झालेल्या उमरज येथील संत नामदेव महाराज मठसंस्थान १९७० पासून लालकंधारी गायी, कालवड आणि वळूचा सांभाळ करीत आहे. संस्थानच्या घागरदरा, उमरज येथील गोशाळेत परिसरातील सोमठाणा, दैठणा, पोखरणी, मारशिवणी, माळहिप्परगा, अडमाळवाडी, नांदूर येथील पशुपालकांकडून भाकड गायी दत्तक घेऊन त्यांची निगा राखली जाते. विशेष म्हणजे दुष्काळी स्थितीत पशुपालकांच्या गायींचे पालन केले जाते. दुष्काळ स्थिती ओसरल्यावर त्या परत केल्या जातात. जनावरांना औषध, सर्वप्रकारचे खुराक, सरकी, पेंड, मका, गहू, सोयाबीन, ज्वारी याचे मिश्रण करून खायाला घातले जाते. दुधाची आवश्यकता असणाऱ्यांना गायी सांभाळण्यासाठी मोफत दिल्या जातात. भाकड झाल्यावर त्या गोशाळांत सामावून घेतल्या जातात.

दुधाचा व्यवसाय नाही

गोशाळांत सर्व सेवा विनामूल्य केली जाते. गायीच्या दुधाचा व्यवसाय केला जात नाही. कालवड आणि वासरांना दूध पाजले जाते. संस्थानच्या विविध गोशाळांत गेल्या ५० वर्षांपासून शेकडो लालकंधारी गायींचे संगोपन सुरू आहे. गोमूत्रापासून गो अर्क आणि जीवामृत तयार केले जाते. उमरज संस्थान व्यतिरिक्त तालुक्यात मानसपुरी, पोखरभोसी, कुरुळा येथेही गोशाळा चालविल्या जातात.

हिंदू धर्मात गोमातेला पवित्र व महत्त्वाचे स्थान आहे. तिची पूजा केली जाते. गोमातेची हत्या होऊ नये म्हणून संत नामदेव महाराज मठसंस्थान उमरजच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून विविध ठिकाणी गोशाळा स्थापन करून गोमातेचे संगोपन, संरक्षण केले जाते. सेवाकार्य म्हणून आम्ही हा उपक्रम राबवतो.

- संत एकनाथ गुरु नामदेव महाराज, मठाधिपती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT