file photo 
नांदेड

नांदेड : रविवारी सेट परीक्षा, शहरात 21 परीक्षा केंद्र : 144 कलम लागू

प्रल्हाद कांबळे

नांदेड : प्राध्यापक पात्रता धारण करण्यासाठी आवश्यक असलेली सेट परीक्षा येत्या रविवारी ( ता. 27) डिसेंबर रोजी शहरातील 21 परीक्षा केंद्रांवर होणार असल्याची माहिती या परीक्षेचे नांदेड केंद्र नियंत्रक व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माध्यम शास्त्र प्रमुख डॉ. दीपक शिंदे यांनी दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सावित्रीबाई पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित ही परीक्षा नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेतली जाते.

महाराष्ट्र व गोवा या राज्यात होणारी ही 36 वी सेट परीक्षा असून विद्यापीठ अनुदान आयोग व महाराष्ट्र शासन यांच्या सूचनांचे पालन करत ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षा सुरळीत पार पाडावी या करिता 21 परीक्षा केंद्र परिसरात जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी कलम 144 लागू केले आहे. त्या मुळे परीक्षा केंद्र परिसराच्या 100 मीटर परिसरात  परीक्षार्थ्या व्यतिरिक्त इतरांना प्रवेश मिळणार नाही. तसेच परीक्षा केंद्र परिसरातील सार्वजनिक टेलिफोन, झेरॉक्स, भ्रमणध्वनि, फॅक्स, ध्वनिक्षेप सकाळी 7 ते सायकाळी 5 वाजेपर्यन्त बंद असतील असा आदेशही डॉ. विपिन यांनी काढला आहे. या कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात पुरेसा पोलिस बंदोबस्त असेल असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक नीलेश मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील यशवंत, एमजीएम, एन सी लॉं कॉलेज, शासकीय तंत्र निकेतन, ग्रामीण कॉलेज ऑफ इंजिनियरिग, ग्रामीण कॉलेज ऑफ सायन्स, ग्रामीण तंत्र निकेतन, सायन्स कॉलेज, नागार्जुना पब्लिक स्कूल, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी, मातोश्री प्रतिष्ठान अभियांत्रिकी व तंत्र निकेतन, एन एस बी कॉलेज, इंदिरा इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी व बी एड कॉलेज, प्रतिभा निकेतन महाविद्यालय, वसंतराव काळे वरिष्ठ महाविद्यालयं देगलूर नाका, इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय सिडको, वसंतराव नाईक महाविद्यालय सिडको या ठिकाणी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेकरिता नांदेड शहरातील परीक्षा केंद्रावर आठ हजार 500 विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

परीक्षार्थ्याना कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे परीक्षेला येण्यापूर्वी सर्व सूचना लक्षात घ्याव्यात असे आवाहन डॉ. दीपक शिंदे यांनी केले आहे. परीक्षेच्या तयारीकरिता सर्व केंद्र प्रमुख, केंद्र निरीक्षक,पर्यवेक्षक यांना महाराष्ट्र शासन, विद्यापीठ अनुदान आयोग, व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने देण्यात आलेल्या  सूचना देण्यात आल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: ''सर्वात जास्त पुरावे तर माझ्याकडे, विरोधी पक्षातले कोण-कोण नेते...'' मुख्यमंत्र्यांचं खरात प्रकरणावर सर्वात मोठं विधान

IPL 2026: 'एक मिनिटही वाया घालवू नका, गेल्यावर्षी जिंकलो त्यामुळे...' विराट कोहलीचा RCB च्या खेळाडूंना सल्ला

Latest Marathi News Live Update : भारत सरकार काळजी घेतंय, पाकिस्तान, बांगलादेशची अवस्था बघा : मुख्यमंत्री फडणवीस

Latur News: बारा बंधाऱ्यांची होणार दुरुस्ती; शासनाकडून ३३ कोटी ७७ लाखांचा निधी; लवकरच कामांना सुरवात

इंडिगोच्या प्रवाशांचं हाल! लंडन ते मुंबई ९ तासांच्या प्रवासाला लागले ३ दिवस, अचानक इजिप्तमध्ये उतरवलं; नुकसानभरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT