file photo 
नांदेड

नांदेडला २८ पॉझिटिव्ह तर तीन जणांचा मृत्यू 

शिवचरण वावळे

नांदेड - नांदेडमध्ये शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी आलेल्या अहवालात २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर दिवसभरात ३७ रुग्णांवर औषधोपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शुक्रवारी दिवसभरात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर उपचार सुरू असलेल्या १६ जणांची प्रकृती अतीगंभीर आहे. 

नांदेडला नोव्हेंबर महिन्यात रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे चित्र आहे. मात्र कोरोना संसर्ग अजूनही संपलेला नाही. जिल्ह्यातील काही तालुक्यात तसेच नांदेड शहरासह इतर शहरात थोड्या फार प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी एक हजार ५१४ जणांचे स्वॅब अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी एक हजार ४६९ निगेटिव्ह आले तर २८ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. यापैकी नांदेड महापालिका क्षेत्रात १४, नांदेड ग्रामिण तीन, अर्धापूरला एक, मुखेड दोन, बिलोली दोन, भोकर दोन, हदगाव दोन आणि यवतमाळ येथील दोन रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा - दिवाळी विशेष : शेतकरी गटाची झेंडू उत्पादनात भरारी, दसरा, दिवाळीत मिळाला बाजारभाव 
 
दिवसभरात तिघांचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात तीन रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामध्ये नवीन मोंढा, नांदेड पुरूष (वय ५१), गुंडेवाडी (ता. लोहा) महिला (वय ६१) आणि वायफना (ता. हदगाव) महिला (वय ७०) यांचा समावेश आहे. दिवसभरात विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयीतील दोन, जिल्हा रुग्णालय कोविड सेंटरमधील १५, महापालिका अंतर्गत एनआरआय भवन आणि गृहविलगीकरणातील असे दहा, किनवट तीन, खासगी रुग्णालयातील सात असे ३७ रुग्णांवर औषधोपचार करून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. 

बरे होण्याचे प्रमाण चांगले
जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९७.३३ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ५९५ झाली असून त्यापैकी १८ हजार ६२६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. त्याचबरोबर आत्तापर्यंत ५३८ कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या २५५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील १६ रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. शुक्रवारी रात्री उशीरापर्यंत ३५४ स्वॅबची तपासणी प्रलंबित आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयात १६६ तर नांदेडच्या जिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटरमध्ये ७९ खाटा शिल्लक असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. 

  • एकूण पॉझिटिव्ह - १९ हजार ५९५ 
  • शुक्रवारी पॉझिटिव्ह - २८ 
  • एकूण कोरोनामुक्त - १८ हजार ६२६ 
  • शुक्रवारी कोरोनामुक्त - ३७ 
  • एकूण मृत्यू - ५३८ 
  • शुक्रवारी मृत्यू - तीन 
  • सध्या उपचार सुरू - २५५ 
  • सध्या अतिगंभीर - १६ 
  • स्वॅब तपासणी प्रलंबित - ३५४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : पुण्यात महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचे शिर उडवण्याचा प्रयत्न; एकाला पोलिसांनी घेतले ताब्यात

Lottery Scam : लॉटरीच्या नावाखाली दाम्पत्याने 600 लोकांना 40 कोटींचा घातला गंडा; लोकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत केली होती गुंतवणूक

Maharashtra Rain Update News : राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस, पुढील पाच दिवस महत्वाचे; ११ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

IT Park:'जमीन पसंत पडेना, आयटी पार्क होईना'; प्रशासनाचा कागदी खेळ, कृषि महाविद्यालयला पर्यायी प्रस्ताव मान्य नाही

Indian Railways: मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे; रेल्वे प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,आरक्षण केंद्रातील यंत्रणेत बदल

SCROLL FOR NEXT