nanded sakal
नांदेड

Nanded : शरद पवार यांच्या समर्थनार्थ शपथपत्र देणार

हरिहरराव भोसीकर; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत निर्णय

सकाळ डिजिटल टीम

Nanded - जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची अगणित संख्या आहे. त्यामुळे जिल्ह्यातून शरद पवार यांच्या समर्थनार्थ त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने दोन हजार कार्यकर्ते तशा प्रकारचे शपथपत्र भरून देणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांनी दिली.

राज्यामध्ये राजकीय घडामोडी पक्षातंर्गत होत असल्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हास्तरावर तातडीची बैठक घेण्याचे आदेश जिल्हाध्यक्षांना दिले. त्यावरून ता. दहा जुलै रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

या बैठकीला जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी, फ्रंटलचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, नगरपालिकेचे माजी सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शरद पवार यांच्यावर जिल्हाध्यक्षांसह सर्वांनी विश्‍वास व्यक्त केला. त्याचबरोबर जिल्ह्यातून दोन हजार पदाधिकाऱ्यांनी शपथपत्र भरून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष भोसीकर यांनी दिली.

या बैठकीला जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर, माजी सभापती भगवानराव पाटील आलेगावकर, डॉ. परशुराम वरपडे, सरचिटणीस प्रा. डी. बी. जांभरूणकर, सुभाष गायकवाड, धनंजय सुर्यवंशी, विक्रम देशमुख, प्रांजली रावणगावकर,

शिवाजी जाधव, वसंतराव देशमुख, अ‍ॅड. अंकुश देशमुख, देवराव टिपरसे, सचिन देशमुख, समाधान जाधव, रमेश गांजापूरकर, बालासाहेब मादसवाड, गंगाधर पाटील मसलगेकर, शंकरराव कदम, शिवानंद शिप्परकर, अभिजीत मुळे, गफार खान, पेठवडजकर,

अ‍ॅड. शिवाजी कदम, प्रकाश मांजरमकर, माधवराव पवार, दिगंबर गवळे, चंपतराव हातागळे, डॉ. समीर खांडारे, अनमोलसिंघ कामठेकर, प्रा. नारायण शिंदे, शंकरराव पाटील, संभाजी सुर्यवंशी, कंठीराम सुर्यवंशी, अ‍ॅड. भाऊसाहेब गोरठेकर,

देवराव पाटील, आनंदराव चिट्टी, मोहंम्मद बुराण, उद्धवराव राजेगोरे, राजेश माने, नम्रता किर्तने, अ‍ॅड. भाऊसाहेब भोसले, मनोज किर्तने, विठ्ठलराव पाटील, नागनाथ पाटील सावळीकर, हनमंत नटूरे, एकनाथ जाधव आदी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: न्यायव्यवस्थेवर टीका करण्यास आक्षेप नाही, पण... सर्वोच्च न्यायालयाचा इशारा, दिली कौतुकास्पद शिक्षा

सगळीकडे 'डाइनिंग विद द कपूर्स'ची चर्चा पण शोमधून आलिया भट्ट गायब; राज कपूर यांच्या नातवाने सांगितलं कारण

Nitish Kumar oath ceremony : नितीशकुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची दहाव्यांदा शपथ घेणार, मोदींची 'ग्रँड एन्ट्री' होणार!

दुर्दैवी घटना ! 'काशीळमधील अपघातात ट्रकचालक ठार'; राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत रास्ता रोको, चाकच अंगावरून गेलं अन्..

Face Yoga Exercises: हिवाळ्यात चमकदार त्वचा हवी? मग रोज 'फेस योगा' करा!

SCROLL FOR NEXT