file photo 
नांदेड

नांदेड : सात लाख ८० हजाराचे वीजबील भरल्याने तीन गुरुव्दारांच्या २८ कृषिपंपाची थकबाकी कोरी

प्रल्हाद कांबळे

नांदेड : महावितरणच्या महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा लाभ घेत श्री संत बाबा बलविंदरसिंग व श्री संत बाबा नरेंद्रसिंग यांच्या पुढाकाराने लोहा व नांदेड शहरा अंतर्गत येणाऱ्या तीन गुरुव्दाराच्या नावे असलेल्या २८ कृषिपंपाची सात लाख ८० हजार रुपयांची वीजबील थकबाकी भरत वीजबील कोरे केले आहे. या निमित्ताने श्री संत बाबा बलविंदरसिंग व श्री संत बाबा नरेंद्रसिंग यांचा लोहा उपविभाग कार्यालयामधे सत्कार करण्यात आला.

लोहा उपविभागा अंतर्गत येणाऱ्या वडेपुरी- खरबी गुरुद्वारा तर नांदेड शहर विभागाअंतर्गत काळेश्वर गुरुद्वारा व मुगट गुरुद्वारा येथील एकुण २८ कृषिपंपाकडे एकूण थकबाकी १५ लाख ९० हजार रुपये होती. महाकृषी ऊर्जा अभियानाच्या धोरणांचा लाभ घेत आठ लाख १० हजार रुपयांची भरघोस सवलत मिळाली. कृषी ऊर्जा पर्वाचा मोठा दिलासा मिळाल्यामुळे सात गुरुव्दाराच्या वतीने सात लाख ८० हजार रुपयांचा भरणा केल्यामुळे त्यांचे २८ कृषिपंप थकबाकी मुक्त झाले आहेत.

राज्यातील कृषी ग्राहकांना नवीन वीजजोडणी, दिवसा आठ तास सौर कृषी वाहिनीद्वारे वीजपुरवठा, कृषी ग्राहकांना थकबाकीत सूट देऊन मोठा दिलासा, कृषी वीजपुरवठा क्षेत्रात ग्रामपंचायती व सहकारी साखर कारखान्यांचा सहभाग व कृषी ग्राहकांच्या पायाभूत सुविधांचे सक्षमीकरण या उद्देशाने राज्य शासनाने कृषिपंप वीजजोडणी धोरण- 2020 जाहीर केले असून, महावितरणद्वारे त्याची अंमलबजावणी केली जात आहे. या धोरणाचे फायदे जास्तीत जास्त कृषी ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यभर ता. एक मार्च ते 14 एप्रिल 2021 पर्यंत कृषी ऊर्जा पर्व राबवले जाणार असून, जनजागृतीसाठी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. धोरणाच्या प्रचारासाठी जिल्हा परिषदा, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसील व पंचायत समिती कार्यालये, बस स्थानके, रेल्वे स्थानके, कृषी बाजारपेठा, मार्केट यार्ड, जत्रेची ठिकाणे, आठवडी बाजारांत  होर्डिंग, पोस्टर व बॅनर लावण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील सर्व बस थांब्यांवर माहिती देऊन जिंगल वाजवण्यात येणार आहे. गाव पातळीवर पथनाटय व दवंडीद्वारे प्रचार केला जाणार आहे.

नांदेड ग्रामीण विभागाच्या वतीने कृषिपंप थकबाकी वसुलीसाठी मोठयाप्रमाणावर जनजागृती केली जात असून थेट बांधावर जावून शेतकऱ्यांना कृषी ऊर्जा पर्वाची माहिती देत थकबाकी भरण्यासाठी व नवीन वीजजोडणी देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण यांनी दिली. याकरिता कार्यकारी अभियंता श्री आर.पी.चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सचिन दंवडे, सहाय्यक लेखापाल कार्तिक जाधव, उच्चस्तर लिपिक आर. डी. सिंदगीकर व जनमित्र परिश्रम घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT