वर्षा ठाकूर 
नांदेड

नांदेड : कोरोनामुक्‍तीचा भोसी पॅटर्न जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार- वर्षा ठाकूर

बुधवार (ता. १२) मे रोजी भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रातंर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेऊन ऑनलाईन संवाद साधला.

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनामुक्‍तीसाठी भोकर तालुक्‍यातील भोसी (Bhokar bhoshi village) गावाने राबविलेल्‍या पॅटर्नमधून ११९ कोरोना बाधित रुग्‍ण पंधरा दिवसानंतर कोरोनामुक्‍त (Corona free) झाले आहेत. हा पॅर्टन जिल्‍ह्यात राबविण्‍यात येणार असल्‍याची माहिती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे (ceo varsha thakur) यांनी दिली आहे. (Nanded: Bhosi pattern of coronation will be implemented in the district - Varsha Thakur)

बुधवार (ता. १२) मे रोजी भोकर तालुक्‍यातील भोसी प्राथमिक आरोग्‍य केंद्रातंर्गत सर्व आरोग्‍य कर्मचारी, आशा वर्कर, परिचारिका, अंगणवाडी कार्यकर्ती, वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेऊन ऑनलाईन संवाद साधला. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. या बैठकिस जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश देशमुख भोसीकर, जिल्‍हा आरोग्‍य आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, तालुका आरोग्‍य अधिकारी डॉ. राहूल वाघमारे, वैद्यकिय अधिकारी डॉ. यू. एम. डोंगरे आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ

दोन महिन्‍यापूर्वी एका लग्‍न सोहळ्यानंतर भोसी येथे एकजण कोरोना बाधीत आढळले, त्‍यानंतर पाच जण बाधित आढळले. यावेळी जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर यांनी आरोग्‍य विभागाच्‍या अधिका-यांची बैठक घेवून ग्रामस्‍थाचे समुपदेशन केले. त्‍यानंतर गावात कोरोना चाचणी करण्‍यात करण्‍यात आली. त्‍यावेळी तब्‍बल ११९ जण बाधित आढळून आले. बाधितांना लगेच त्‍यांच्‍या शेतातच राहण्‍याची सोय करण्‍यात आली. ज्‍यांच्‍याकडे शेती नाही त्‍यांची सोय प्रकाश भोसीकर यांच्‍या शेतात शेडमध्‍ये करण्‍यात आली. आरोग्‍य सेविका, आशाताई, अंगणवाडी कार्यकर्ती यांनी दररोज शेतात जाऊन बांधितांशी संवाद साधून त्‍याच ठिकणी औषधी व जेवण पुरविण्‍याता आले. या उपक्रमामुळे पंधरा दिवसात ११९ कोरोना बाधित कोरोनामुक्‍त झाले. बाधित व्‍यक्‍ती गाव सोडून शेतात राहिल्‍यामुळे गावात कोरोना पसरु शकला नाही.

या उपक्रमाचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी सर्व आरोग्‍य अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर, अंगणवाडी कार्यकती आदींचे अभिनंदन केले. भोसी येथे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी समन्‍वय ठेवून जसा पॅटर्न राबविला तसाच पॅर्टन जिल्‍ह्यात राबविण्‍यात यावा असे निर्देश त्‍यांनी यावेळी दिले.

यावेळी आरोग्‍य कर्मचा-यांनी गावात राबविण्‍यात आलेल्‍या उपक्रामाची माहिती सिईओंना दिली. जिल्‍हा परिषद सदस्‍य प्रकाश भोसीकर म्‍हणाले, कोरोना विषयी भिती बाळगण्‍याची गरज नाही. कोरोना झालेल्‍या व्‍यक्‍तींनी आपल्‍या गावापासून दूर राहिल्‍यास गावात कोरोनाचा प्रसार होणार नाही. भोसी येथे सर्व बाधित नागरिकांना शेतात विलगीकरणात ठेवल्‍यामुळे आम्‍ही कोरोनाला भोसीमध्‍ये रोखू शकलो. या उपक्रमामुळे दोन महिन्‍यापासून गावात रुग्‍ण आढळलेला नाही. कोरोनामुक्‍तीसाठी जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी सूक्ष्‍म नियोजन केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT