file photo 
नांदेड

नांदेड : ब्राह्मण समाजाबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही- निखिल लातूरकर

प्रल्हाद कांबळे

नांदेड : ब्राह्मण समाजाबद्दल विनाकारण अपशब्द वापरणारे शेतकरी आंदोलनातील राकेश टिकैत यांचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कार्याध्यक्ष तथा युवा नेते निखिल लातूरकर यांनी निषेध केला आहे. एवढेच नाही तर भविष्यात ब्राह्मण समाजाबद्दल कुणीही गरळ ओकण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड इशाराही श्री. लातूरकर यांनी दिला आहे.

ब्राह्मण समाजाला गाय व्याल्यानंतर त्याचे पहिले दूध ब्राह्मणांना देतो. ते त्यांनी आम्हाला परत करावे, ब्राह्मणांना मंदिरातून काढून टाकावे, असे बिनबुडाचे वक्तव्य शेतकरी आंदोलनात करण्यात आले आहे. ब्राह्मण समाज शेतकरी आंदोलनाच्या विरोधात नाही. तसेच ब्राह्मण समाजाला भाजप किंवा काँग्रेस अथवा अन्य कोणत्याही पक्षाशी काही देणेघेणे नाही. शेतकरी आंदोलनाचे आम्ही समर्थक असल्याचे लातूरकर यांनी सांगितले आहे.

केवळ राकेश टिकैत यांनी संबंध ब्राम्हण समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन तमाम ब्राम्हण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आमचा केवळ राकेश टिकैत यांचा निषेध करीत आहोत असे लातूरकर यांनी म्हंटले आहे. राकेश टिकैत यांनी दिलेली दान दक्षिणा आम्ही त्यांना धनादेशाच्या स्वरुपात परत करणार असून दुधाचा टँकरसुद्धा पाठविण्यात येईल. असे लातूरकर यांनी सांगितले आहे. राकेश टीकैत असो की इतर कोणीही ब्राह्मण समाजबद्दल टीका सहन केल्या जाणार नाही. टिकाकारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यात येईल असा इशाराही लातूरकर यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : "महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय; बाहेरच्या चर्चांकडे लक्ष देऊ नका"– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे!

Pune Solapur Highway : कुरकुंभ हद्दीत प्रवाशांवर जीवघेणा हल्ला; सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना!

Latest Marathi News Live Update : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी २० महिन्यांनंतर हरिद्वारमधून गजाआड

Mohol Political : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका घडयाळ चिन्हावर लढविणार- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील!

PMC Election : पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्जाची विक्री जोरात; आकडा ९ हजाराहून अधिक; फक्त आठ अर्ज दाखल!

SCROLL FOR NEXT