File photo 
नांदेड

नांदेड ब्रेकिंग : आज तीन पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या ३८

शिवचरण वावळे

नांदेड : गुरुवारी (ता.सात मे) प्रलंबीत असलेल्या ५१ जणांपैकी शुक्रवारी (ता. आठ) २३ अहवाल प्राप्त झाले असून, त्यात २० निगेटिव्ह तर तीन पॉझिटिव्ह रुग्ण निघाले आहेत. त्यामुळे आता नांदेडमधील रुग्णांची संख्या ३८ वर गेली आहे. त्यापैकी चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे.

मागील तीन दिवसांपासून शहरात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण येत नसल्याने नांदेडकरांमध्ये दिलासा निर्माण झाला होता. परंतु, शुक्रवारची पहाट नांदेडकरांसाठी पुन्हा चिंतेची ठरली आहे. गुरुवारी एकूण ५१ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी शुक्रवारी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यात २० निगेटिव्ह तर तीघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नांदेडकरांच्या चिंतेत वाढ झाली असून, अत्यावश्‍यक कामाशिवाय घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुद्वार लंगरसाहेब येथे अडकलेल्या भाविकांना पंजाबला सोडण्यासाठी गेलेल्या चार ड्रायव्हरांना परत आल्यावर कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे गुरुद्वारा परिसरातील ९७ संशयितांच्या स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी २० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने नांदेडकरांसह जिल्हा प्रशासन हादरून गेले होते. या २० पैकी चारजण प्रशासनाच्या हरगर्जिपणामुळे फरार झाले. त्यापैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले असून, अद्‍यापही तीघेजण फरारच आहेत.  

शुक्रवारी सापडलेल्या तीन कोरोना बाधितांपैकी दोन रुग्ण हे अबचलनगर येथील असून, त्यात ३६ वर्षीय महिला व ३८ वर्षीय पुरुषाचा तर रविनगर (कौठा) येथील एका ३५ वर्षीय व्यक्तीचा त्यामध्ये समावेश आहे. हे तीन्हीही रुग्ण आधीच्या रुग्णांच्या संपर्कातील असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. नागरिकांनी घाबरून न जाता, तसेच अफवांवर विश्‍वास न ठेवता घरातच थांबण्याचे आवाहनही डॉ. भोसीकर यांनी केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तरुणांच्या मुद्द्यावर CJP पुन्हा आक्रमक; केंद्राच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह, आंदोलनाचा इशारा

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

SCROLL FOR NEXT