Nanded Photo 
नांदेड

कोरोना चाचणीचा रस्ता घाण पाण्यातून, नागरिकांचे हाल; महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष 

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असताना दुसरीकडे कोरोना चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. एनआरआय भवनऐवजी नाना-नानी पार्क येथे सुरू करण्यात आलेल्या क्लिनिकसमोरच पावसामुळे रस्त्यावर नाल्यांचे घाण पाणी आले आहे. गटाराचे घाण पाणी साचत असल्यामुळे कोरोनाची चाचणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना त्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. 

शिवाजीनगर भागामधील नाना - नानी पार्कच्या समोरच महापालिकेचे आरोग्य रुग्णालय आहे. त्याच्या शेजारच्या मोकळ्या भूखंडात गटाराचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे आणखी घाण वाढली आहे. नाना-नानी पार्कसमोरील रस्त्यावर हे घाण पाणी साचत आहे. त्यातच पाऊस आल्यास रस्त्यावर एक फुटापर्यंत पाणी साचत आहे. पाणी जाण्यासाठी कुठेही जागा नाही, तसेच महापालिकेच्या वतीने पाणी जाण्यासाठी कुठलेही प्रयत्न केले जात नसल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचून राहत आहे. 

स्वच्छता विभागाने त्याकडे दुर्लक्ष 

तसेच या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पाण्यातून गाडी चालवताना वाहनधारकांचे हाल होत आहेत. पावसाळा संपत आला तरी महापालिकेच्या स्वच्छता विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली. 

महापालिकेने द्यावे लक्ष 

आरोग्याची काळजी घ्या, असे घशाला कोरड येईपर्यंत ओरडून सांगणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य विभाग तसेच स्वच्छता विभागाकडून मात्र तुंबलेल्या गटाराच्या पाण्याला वाट करून देण्यासाठी कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसून येत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. कोरोना चाचणी महत्वाची असल्यामुळे नागरिक त्यातूनच वाट काढून पुढे जात आहेत. त्यामुळे महापालिकेने तत्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेच्या मागणीसाठी ठाण्यात समर्थकांचे आक्रमक आंदोलन!

मतदार यादीत नाव असताना फॉर्म ६ कशाला? SIR प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सवाल

Pune News : टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करा; जयंत पाटील यांना भाजपचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT