vaccination 
नांदेड

नांदेड : 45 वर्षांवरील नागरिकांना दुसऱ्या डोससाठी कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस उपलब्ध

सोमवार 17 मेसाठी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे

प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील 45 पेक्षा अधिक वय वर्षे असलेल्या ज्या नागरिकांचा दुसरा डोस बाकी आहे (Second vaccine) अशा नागरिकांना सोमवारी (ता. १७) कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा दुसरा (Covishild and covaccine) डोस लसीकरण केंद्रांवर उपलब्ध केला आहे. लसीच्या उपलब्धतेप्रमाणे जिल्ह्यातील एकुण 92 केंद्रांवर (92 vaccination center) लसीकरण केले जात आहे. (Nanded: Covacin and Covishield vaccine available for second dose to citizens above 45 years of age)

सोमवार 17 मेसाठी प्रत्येक केंद्रनिहाय प्रत्येकी 100 डोस याप्रमाणे कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन मिळाले आहेत. ज्या नागरिकांनी पहिला कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा डोस घेतला आहे त्यांनी लसीकरण केंद्रावर उपलब्धतेप्रमाणे लस घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले आहे. लस उपलब्ध झाल्याप्रमाणे टप्याटप्यात सर्वांना लसीकरण केले जाईल. नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करुन लसीकरणाबाबतची वस्तुस्थिती समजून घ्यावी, असे आवाहन केले त्यांनी केले.

हेही वाचा- खासदार राजीव सातव यांचे पार्थीव राजसदन या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यानंतर चाहत्यांच्या अश्रूंचे बांध फुटले. सोमवारी (ता. १७) सकाळी सर्व विधीवत पूजा करुन साडेसात वाजता अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थीव निवासस्थानासमोरील भव्य मंडपात ठेवण्यात आले. याच त्यांच्या निवासस्थान परिसरात साडेदहा वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

नांदेड शहरात पुढीलप्रमाणे लसीकरण केंद्र आहेत.

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या श्री गुरु गोविंदसिंघ जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा, सिडको या आठ केंद्रावर 45वर्षावरील नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचा लस उपलब्ध आहे. मनपा क्षेत्रात स्त्री रुग्णालय येथे कोव्हॅक्सिन तर शहरी क्षेत्रात मोडणारे सर्व उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय अशा एकुण 16 लसीकरण केंद्रांवर कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन ही लस आणि ग्रामीण क्षेत्रात मोडणाऱ्या एकुण 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशिल्ड ही लस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 45 वर्षांवरील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रांना नमूद केल्या प्रमाणे प्रत्येकी शंभर डोस उपलब्ध झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात 16 मेपर्यंत कोविशिल्डचे 3 लाख 34 हजार 930 व कोव्हॅक्सिनचे 1 लाख एक हजार 800 डोस असे एकुण चार लाख 36 हजार 730 डोस मिळाले आहेत. जिल्ह्यात 15 मे 2021 पर्यंत एकुण तीन लाख 96 हजार 200 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 12 ते 16 आठवडे या कालावधीत म्हणजेच 84 दिवसानंतर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध असलेला कोविड-19 लसीचासाठा हा केवळ 45 वर्षावरील लाभार्थ्यांना प्राधान्याने दुसरा डोस देण्यासाठी व दुसऱ्या डोसचे लाभार्थी नसल्यास प्रथम डोससाठी वापरण्यात येणार आहे. उपलब्ध कोव्हॅक्सिनची लस 45 वर्षावरील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोससाठी वापरण्यात येणार आहे. वय 18 ते 44 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण तात्पुरते थांबवण्यात आले आहे. नागरिकांनी लसीकरण केंद्रावर जावून अनावश्यक गर्दी करु नये. तसेच कोविड-19 लसीकरण कार्यक्रमास सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा आरोग्य विभागामार्फत केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

बाबो! सुरज चव्हाणचं खरंच लग्न ठरलं? सोशल मीडियावर शेयर केलेली पोस्ट चर्चेत, चाहत्यांचा म्हणाले..."हीच का आपली वहिनी?"

SCROLL FOR NEXT