File Photo 
नांदेड

Corona Updates : दिलासा! नांदेडमध्ये एक जण कोरोनाबाधित

शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यात सोमवारी (ता.२३) प्राप्त झालेल्या एक हजार २२८ अहवालांपैकी एक अहवाल कोरोनाबाधित (Corona) आला आहे. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या ९० हजार ७२२ एवढी झाली असून यातील ८८ हजार २३ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ३८ रुग्ण उपचार घेत असून ३ बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६६१ एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड ग्रामीणमध्ये (Nanded) एक बाधित आढळला. सोमवारी जिल्ह्यातील पाच कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी - दोन, हिमायतनगर (Himayatnagar) - एक, मनपाअंतर्गत (Nanded Municipal Corporation) एनआरआय भवन गृहविलगीकरण - दोन व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सोमवारी ३८ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी- दहा, देगलूर -एक, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण २४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण- तीन व्यक्ती उपचार घेत आहेत. सोमवारी सायंकाळपर्यंत विष्णुपुरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात-१२४, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयात -१४५ खाटा उपलब्ध आहेत.

कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९० हजार ७२२

एकूण कोरोनामुक्त - ८८ हजार २३

एकूण मृत्यू - दोन हजार ६६१

सोमवारी पॉझिटिव्ह - एक

सोमवारी कोरोनामुक्त - पाच

सोमवारी मृत्यू - शुन्य

रुग्णालयात उपचार सुरु - ३८

अतिगंभीर रुग्ण - तीन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Live News : अवमानना याचिकेवर सुप्रीम कोर्टाची दिल्ली पोलिसांना नोटीस

RBI Special Window: रिझर्व्ह बँकेची ‘स्पेशल विंडो;तेल कंपन्यांना होणार डॉलरचा अखंडित पुरवठा

Amravati Crime: अमरावतीत आयटी इंजिनिअरने आईला संपवलं, स्वत:च पोलिसांना जाऊन सांगितलं

IND A vs AUS A: सूर्यांश शेडगेची झुंज! भारत अ संघाने ऑस्ट्रेलियासमोर ठेवलं २७६ धावांचं लक्ष्य

Jharkhand Tribal Woman : आदिवासी महिलेला पोलिस ठाण्यात उलटे टांगले अन्... पोलिसांच्या धक्कादायक कृत्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल

SCROLL FOR NEXT