corona .jpg 
नांदेड

नांदेडकरांनी सोडला सुटकेचा निःश्वास! फक्त एक जण कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी (ता. २१) प्राप्त झालेल्या ६३७ अहवालापैकी एकजण कोरोनाबाधित आला आहे. दिवसभरात दोन कोरोनाबाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली. मंगळवार घडीला २४ रुग्ण उपचार घेत असून चार बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.३ टक्के इतके आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९० हजार ३०७ झाली असून त्यातील ८७ हजार ६३२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५१ आहे. मंगळवारी बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड महापालिका हद्दीत एक बाधित आढळला. सध्या २४ रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत.

यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरीला आठ, नांदेड महापालिका अंतर्गत गृह विलगीकरणात ११, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण चार, खासगी रुग्णालयात एक व्यक्ती उपचार घेत आहे.

नांदेड कोरोना मीटर
एकुण स्वॅब- ७ लाख २६ हजार ५२५
एकुण निगेटिव्ह - ६ लाख ३३ हजार २०५
एकुण बाधित - ९० हजार ३०७
एकूण बरे - ८७ हजार ६३२
एकुण मृत्यू - २ हजार ६५१
मंगळवारी बाधित - एक
मंगळवारी बरे - दोन
मंगळवारी मृत्यू - शून्य
उपचार सुरू - २४
अतिगंभीर प्रकृती - चार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

Shreeram Gaikwad Death Case: श्रीराम गायकवाड संशयास्पद मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; देवगाव रंगारीत कुटुंबीय व भिल्ल समाजाचे आमरण उपोषण

Jorhat Airbase Incident Video : हवाई दलाच्या विमानाला लँडिंगदरम्यान भीषण आग, ५ जवान शहीद; दुर्घटनेचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT