Gamblers Sakal
नांदेड

Nanded Crime: हदगाव, पीरनगर भागात जुगार अड्ड्यावर छापा, सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त

दुसऱ्या घटनेत हदगाव शहरातील शिवाजी चौक भागात नऊ आरोपी विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

सकाळ डिजिटल टीम

Nanded Crime - पोलिसांच्या पथकाने नांदेड शहरातील पिरनगर आणि हदगाव शहरात शिवाजी चौक येथे जुगार अड्यावर छापा मारून २५ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख २३ हजार २८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत हदगाव आणि विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील पिरनगर येथे शेख सल्लाऊद्दीन शेख करीमोद्दीन यांच्या मालकीच्या बंद घरात सोळा आरोपी विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार मटका खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

पोलिसांनी छापा टाकून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण दोन लाख ९१ हजार ९१० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. य़ाबाबत पोलिस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार गौड करत आहेत.

दुसऱ्या घटनेत हदगाव शहरातील शिवाजी चौक भागात नऊ आरोपी विनापरवाना आणि बेकायदेशिररित्या जुगार खेळताना आणि खेळविताना आढळून आले.

पोलिसांनी छापा टाकून बाराशे रुपयांचे जुगाराचे साहित्य आणि १९ हजार ३७० रुपये रोख असा एकूण ३१ हजार ३७० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोलिस जमादार खाकोबा चिंतले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Choti Diwali 2025 Marathi Wishes: छोटी दिवाळी अन् नरक चतुर्दशीच्या नातेवाईक अन् मित्रपरिवाला द्या खास शुभेच्छा

Fake Crowd Videos: महत्त्वाची बातमी! स्थानकांवरील गर्दीचे जुने व्हिडिओ व्हायरल कराल तर खबरदार... रेल्वे प्रशासनाचा कडक इशारा

Thailand Tour Package: थायलंडला फिरायला जायचं आहे? मग IRCTC चं 7 दिवसांचं खास टूर पॅकेज बुक करा आणि अविस्मरणीय प्रवासाचा अनुभव घ्या!

एक खून आणि अनेक भास ! उत्कंठा वाढवणारा असंभव सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन खरेदी करण्यासाठी पुणेकरांची लगबग

SCROLL FOR NEXT