nanded crime esakal
नांदेड

Nanded News : जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह करण्यात आले अटक!

वजिराबाद पोलिसांची १४ तासांच्या आत कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nanded : रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्यांना अडवून जबरी चोरी करण्याचे प्रकार अलिकडे वाढले आहेत. त्यासाठी पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी यावर आळा घालण्यासाठी सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क केले आहे. त्यानुषंगाने वजीराबाद पोलिसांनी २४ तासाच्या आत जबरी चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, मोहम्मद फैज मोहम्मद सईद (रा. इतवारा) हे त्यांचा मित्र शेख अरबाज यांच्या सोबत देगलूर नाक्याकडे १३ जुलै रोजी जात हते. यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन व्यक्तींनी त्यांना खंजरचा धाक दाखवून जबरी चोरी केली होती. त्याचा गुन्हा वजीराबाद पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

त्यावरून आरोपींचा शोध सुरु असताना खुनाच्या गुन्ह्यातून जामीनावर सुटलेला आरोपी जयमलसिंघ उर्फ गग्ग् हरबंससिंघ धालीवाल (वय २०, रा. अबचलनगर नांदेड) हा पंजाब राज्यातून आला असून, त्यांनीच साथीदाराच्या मदतीने हा गुन्हा केला असून तो पंजाबला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यावरून त्याचा शोध घेतला असता तो नगीनाघाट येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा पाठलाग करून जयमलसिंघसह आकाशसिंघ साहेबसिंघ सुखमनी (वय २२, रा. बडपूरा नांदेड) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दुचाकीसह जबरीने चोरी केलेले रोख दोन हजार रुपये जप्त केले आहे.

त्यांना सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे यांनी न्यायालयात हजर केले असता, त्यांना १९ जुलैपर्यंत कोठडी मिळाली आहे. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक शिवराज जमदडे, चंद्रकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दशरथ आडे, पोलिस अमलदार शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, मनोज परदेशी, रमेश सूर्यवंशी, शेख ईम्रान, साहेबराव कदम, राजु बोधगिरे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT