file photo 
नांदेड

नांदेड : विनापरवाना चौकी मिरवणूक काढल्या प्रकरणी तीन पोलिस ठाण्यात 150 जणांवर गुन्हे दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लावलेले असताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होईल असे घातक कृत्य करून विनापरवाना चौकी मिरवणूक काढल्याबद्दल विविध पोलिस ठाण्यात 100 ते 150 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

संपूर्ण देशासह नांदेड जिल्ह्यातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबविण्यात येत असून संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी निर्बन्ध घालण्यात आले असून मिरवणुकीवरही बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही एक डिसेंबर रोजी जुना मोंढा,चंदासिंग कॉर्नर ते लातूरफाटा तसेच देगलूर तालुक्यातील वन्नाळी येथील गुरुद्वारासमोर दुचाकीस्वारांनी संगनमत करून शासकीय आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना चौकी मिरवणूक काढली. यावेळी दुचाकीस्वारांनी वाहनाचे सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यांचे आवाज काढत भरधाव वेगात वाहने पळविली.

यावरही तरुणांनी तोंडाला मास्क न बांधता सामाजिक अंतरही न ठेवता भरधाव वेगात वाहने चालवून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढेल असे कृत्य करुन जाणीवपूर्वक जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी देगलूर, नांदेड ग्रामीण व वजीराबाद पोलिसांनी 100 ते 150 जणांविरुद्ध राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन 2005 कलम 51(ब),सह कलम 279 ,मोटरवाहन कायद्यासह ईतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'ला काळीमा? लॉकअपमध्ये असलेल्या आरोपीकडे मुलीला ‘एका रात्रीसाठी’ पाठवण्याची कथित मागणी

IPL 2026: श्रेयस अय्यरवर BCCI ची मोठ्या किंमतीच्या दंडाची कारवाई; PBKS vs GT सामन्यात झालेली चूक

Pune Municipal Property: पुणे महापालिकेच्या ताब्यातील चार हजार मिळकती बेवारस; प्रॉपर्टी कार्डवर नोंदच नाही, मालमत्ता विभागाचे दुर्लक्ष!

IPL 2026 PKBS vs GT : गुजरातविरुद्ध सामन्यात पंजाब किंग्जला विजय मिळून देणारा कूपर कोनोली नेमका कोण? रिंकी पाँटिंगशी आहे खास कनेक्शन...

Mumbai News: प्रामाणिक कामगिरीतूनच यश; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ‘यिन’ अधिवेशनात युवकांना मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT