file photo 
नांदेड

नांदेड : लोहा तालुक्यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

बा. पू. गायखर

लोहा (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील गोलेगाव (प. क.) येथील अल्पभूधारक शेतकरी सचिन रामराव नाईकवाडे (वय ४२) यानी सततच्या नापिकीमुळे विष प्राशन करुन रविवारी (ता. २०) सकाळी आत्महत्या केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गोलेगाव येथील सचिन नाईकवाडे हे गेल्या सहा महिन्यापासून आर्थिक विवंचनेत होते त्यांनी लोहा शाखेच्या बँक ऑफ इंडिया येथून शेतीच्या पेरणीसाठी कर्ज उचलले होते. मात्र सततच्या नापिकीमुळे हंगाम हातचा गेला. याचा परिणाम कर्जाचा बोजा वाढत गेला. त्यांनी गावाच्या पश्चिमेस असलेल्या स्वतः च्या शेतात विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २०) सकाळी घडली. त्यांच्या पश्चात आई- वडील, एक छोटा भाऊ, पत्नी, दोन लहान मुल आहेत. त्याच्या पार्थीवावर गोलेगाव येथे ठिक दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सचिन नाईकवाडे हा अल्पभूधारक शेतकरी सातत्याने नवनवीन पिकाची माहिती घेऊन उत्पादन वाढण्यासाठी प्रयत्न करीत असे. जमीन कसण्याबरोबर तो आठवडी बाजारात गायी- म्हशीची खरेदी- विक्रीचा व्यवसाय करत. त्यातही मोठे अपयश आल्याचे तो मिञांना बोलुन दाखवत असे. विशेषतः पडीत गायरान जमीन क्षेत्र वहितीखाली आणण्यासाठी त्याने विशेष प्रयत्न केले होते. कष्टाळू, मायाळू आणि वारकरी संप्रदायासाठी विशेष योगदान देणारा सचिन याला चार- पाच महिन्यापासून तो सातत्याने दबावात राहत होता. आपल्या मित्रांना तो नेहमी आपली खंत व्यक्त करताना म्हणायचा शेतीसाठी ५० हजार रुपये खर्च झाला. उत्पादन मात्र अडीच ते तीन हजार रुपये, खायचं कसं दोन पैसे कर्ज फेडायचे कसे आपल्या शेतीत सोयाबीन आणि कापूस मोठ्या प्रमाणावर त्यांनी लागवड केली होती.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT