देवेंद्र फडणवीस  file photo
नांदेड

मराठवाड्याची अस्मिता गहाण ठेऊ नका : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांची राज्य सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा

बिलोली : राज्यातील गोरगरीब, मराठवाड्याच्या हितासाठी आमच्या काळात सुरू झालेल्या महत्त्वाच्या योजना सध्याच्या सरकारने बंद केल्या. वैधानिक विकास मंडळ बंद करून मराठवाड्यावर अन्याय करण्यात आला. सत्तेसाठी लाचार होऊन मराठवाड्याची अस्मिता गहाण ठेऊ नका, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. २५) केले.

विधानसभेच्या देगलूर - बिलोली मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील भाजप- मित्र पक्षाचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी (ता. २५) येते झालेल्या सभेत ते बोलत होते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय राज्यमंत्री भागवत खुबा, माजी मंत्री बबनराव लोणीकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, आमदार राम पाटील रातोळीकर, राजेश पवार, डॉ. तुषार राठोड, गोपीचंद पडळकर, गोविंद केंद्रे, डॉ. अजित गोपछडे, राजेश कुंटूरकर, लक्ष्मणराव ठक्करवाड आदी उपस्थित होते.

राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने जलयुक्त शिवार, मराठवाडा सिंचन प्रकल्प, वैधानिक विकास मंडळ यासह गोरगरिबांच्या अनेक योजना बंद करून भ्रष्टाचार वाढविला. हे विकासाला प्राधान्य देणारे सरकार नव्हे तर चालू लोकांचे चालू सरकार आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण या सरकारने घालवले. मन्नेरवारलू, कोळी समाजासह कुठल्याही समाजाला न्याय न देणारे हे निष्क्रिय सरकार आहे. एवढा अनागोंदी कारभार चाललेला असताना मराठवाड्याची अस्मिता गहाण ठेवण्याचे प्रकारही सत्तेसाठी लाचार असलेल्या मंडळींकडून होताना दिसत आहे. पोटनिवडणुकीच्या माध्यमातून या सरकारला झटका देण्याची सुवर्णसंधी मतदारांच्या हाती आहे. या संधीचे सोने करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

आठवले, खुबा, खासदार चिखलीकर, जिल्हाध्यक्ष गोजेगावकर, उमेदवार साबणेंनी मनोगत व्यक्त केले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भ्रष्टाचार करून सर्वसामान्यांची लूट करत आहे. मात्र, केंद्र सरकार गोरगरिबांच्या कल्याणासाठीच्या योजना प्रभावीपणे राबवीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्व क्षेत्रातील दलाली बंद करून गोरगरिबांना बळकट करण्याचे काम करीत आहेत. त्यामुळे केंद्र शासनाच्या सर्व योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजप विशेष प्रयत्न करत आहे.

- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्ष नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

Hingoli Earthquake :हिंगोली जिल्हा भूकंपाने पुन्हा हादरला ;गडाळा, पांगरा शिंदे येथे केंद्रबिंदू; भिंतींनाही तडे

Latest Marathi News Live Update : अकोला दौऱ्यात शेतकऱ्यांच्या बांधावर मंत्री बावनकुळेंचा संवाद; पिठलं-भाकरीचा घेतला आस्वाद

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात चौकशीचे आदेश, २० वर्षे जुन्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची फाइल पुन्हा उघडली

SCROLL FOR NEXT