Ration Card
Ration Card Sakal
नांदेड

Nanded : रेशनकार्डधारकांची झोळी अद्याप रिकामीच

सुरेश घाळे

धर्माबाद : गरीबाची दिवाळी व्हावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामीण भागातील गरीब जनतेला रेशनकार्डवर शंभर रुपयात तेल, रवा, साखर, चनाडाळ मिळणार असल्याची घोषणा केली होती. मात्र धर्माबाद पुरवठा विभागाकडे यापैकी फक्त ६ हजार किलो चनाडाळ व १० हजार पिशव्या आदी साहित्य धर्माबाद येथील शासकीय धान्य गोदामात आले आहे.

उर्वरित किट लवकरच येणार असून दिवाळीपूर्वीच वाटप करणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय शिंदे, नायब तहसीलदार सुनील पांडे व गोदामपाल अशोक भालेराव यांनी सांगितले असले तरी दिवाळी दोन दिवसावर आली आहे. आनंदाचा शिधा रेशनकार्डधारकांच्या हातात पडलेला नाही.

त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी आनंदाचा शिधा येण्याची वाट बघत दुःखात घालवण्याची वेळ आली असून वाटप कधी होणार? असा प्रश्न लाभार्थी विचारत आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंत्योदय आणि अन्नसुरक्षा तसेच प्राधान्य कुटुंब योजनेतील रेशनकार्डधारकांना येणाऱ्या दिवाळीला दिलासा मिळावा, यासाठी नियमित धान्य सोडून साखर, तेल, रवा, हरभरा डाळ प्रति किलो देण्यात येणार आहे.

त्यासाठी एकत्रित किट करून ती लाभार्थ्यांना वाटप करण्याच्या सूचना शासनाच्या पुरवठा विभागाने केले आहेत. त्यामुळे धर्माबाद शासकीय धान्य गोदामला आतापर्यंत फक्त ६ हजार किलो चणाडाळ व १० हजार पिशव्या पोहोच झाले आहे. उर्वरित चना डाळ, रवा, पामतेल, साखरेचा अद्याप पत्ता नाही.

दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यानुसार तालुक्यातील अंत्योदय योजना कार्डधारकांची संख्या २ हजार ४५० असून लाभार्थी संख्या ९ हजार ९७३ आहे, प्राधान्य कुटुंब योजना कार्डधारकांची संख्या १० हजार ७०० असून लाभार्थी संख्या ४५ हजार ३७९ आहे. शेतकरी योजना कार्डधारकांची संख्या ४ हजार ४१० असून लाभार्थी संख्या १८ हजार ७३० अशी आहे.

धर्माबाद तालुक्यात एकूण जवळपास १७ हजार ५६० कार्डधारक असून ७४ हजार ८२ लाभार्थ्यांना हे किट वाटप करण्यात येणार आहे. मात्र गोडाऊनलाच अद्याप साहित्य पोहोचलेले नाही. त्यामुळे ते लाभार्थ्यांपर्यंत दिवाळीपूर्वी पोहोचणार का? याविषयी आता साशंकता निर्माण झाली आहे. त्यासाठी तालुका पुरवठा विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

साहित्य अद्याप गोडाऊनमध्ये आले नाही तर मग किट तयार कोणी करायचे आणि त्याचे वाटप कधी करायचे? असा प्रश्न तालुका पुरवठा विभागासमोर उभा राहिला आहे. गोडाऊनला येणारे साहित्य थेट गोण्यामधून येत आहे. त्यामुळे त्याचे किट कोणी तयार करायचे? असा प्रश्न आता नव्याने उपस्थित झाला आहे.

गोडाऊनला त्यासाठी खास लोकांना नेमायचे झाले तर त्यासाठी लागणारे साहित्य कोणी आणायचे आणि त्याचा खर्च कोणी करायचा? असाही प्रश्न ही पुरवठा विभागासमोर उभा राहिला आहे. त्यामुळे हे किट तयार करण्याचे काम आता रेशनदुकानदारांच्या माथी मारणार की काय, या धास्तीने आता रेशन दुकानदारही हवालदिल झाले आहेत.

पिशव्या, चनाडाळ पोहोचली; तेल, रवा, साखरेचा पत्ता नाही

दिवाळी दोन दिवसांवर येऊन ठेपली असतानाच पुरवठा विभागाने जाहीर केल्याप्रमाणे दिवाळीसाठी किट अद्याप रेशन दुकानावर पोहोचलेच नाही. त्यामुळे रेशनदुकानदारांची डोकेदुखी वाढली आहे. लाभार्थी रेशनदुकानावर गर्दी करीत आहेत.

दुसरीकडे पुरवठा विभागाकडून वेळेवर साहित्य पुरवठा होईल की नाही याची साशंकता निर्माण झाली आहे. त्यामुळे गरिबांची दिवाळी गोड होणार की कडू? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आतापर्यंत धर्माबाद शासकीय धान्य गोदामला फक्त १० हजार पिशव्या आणि ६ हजार किलो चणाडाळ चा पुरवठा झालेला आहे. उर्वरित चणाडाळ, तेल, रवा, साखरेचा अद्याप पत्ता नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT