file photo 
नांदेड

नांदेड : तुरीवर रोग पडल्याने तुरीच्या झाल्या तुराट्या

प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) ः तालुक्यात तुरीवर रोग पडल्याने हाताला आलेली तुर वाळून गेल्याने बळीराजाच्या संकटात पुन्हा भर पडली असून महसूल विभागाने तुर पिकांचा सर्वे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी तालुक्यातील बळीराजातून केली जात आहे.


तालुक्यात ह्या वर्षी मोठ्या पावसाची नोंद तालुक्यात झाली असल्याने कापूस सोयाबीन पिके हातून गेली परिणामी कापसाच्या पराट्या झाल्या. आणी कापूस उत्पादनात मोठी घट झाली. सोयाबीनची सुद्धा हिच गत होऊन प्रती बॅगला नऊ ते दहा क्विटंल उतारा अपेक्षित असताना मात्र पाच ते सहा क्विटंल उतारा आला असून आता वर्षभर संसाराचा गाडा कसा चालवायचा म्हणून तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त दिसत आहे.

कापूस गेला सोयाबीन गेले आता शेतकऱ्यांला आधार देणारे नगदी पीक तूर रोग रोग पडल्याने तुरीची उभी झाडे वाळून गेल्याने होती ती आशा मावळली असून हा भयंकर रोग कोणता तो शोध कृषी विभागने लावणे अपेक्षित आसताना मात्र अद्याप कृषी विभागातील एकही अधिकारी व कर्मचारी बाधांवर गेला नाही. तरी शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

शासनाकडून सर्वे करून तत्काळ मदत द्यावी.

शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून तूर या पिकाचा मोठा आधार आहे. मात्र तुर वाळून गेली असल्याने आम्हा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाकडून सर्वे करून तत्काळ मदत द्यावी.
- भुजंग देशमुख, शेतकरी, पोटा.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT