Nanded District Central Co-operative Bank Election.jpg 
नांदेड

काँग्रेसचे बाबुराव कोंढेकर यांचा अर्धापूर सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून एकतर्फी विजय

लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (नांदेड) : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या निवडणुकीत भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर, मुदखेड, अर्धापूर या तिन्ही तालुक्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले आहे. या तिन्ही तालुक्यातून महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत.

अर्धापूर तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोंढेकर यांचा एकतर्फी विजय झाला आहे. त्यांनी 24 पैकी 23 मते घेतली आहेत. तर भाजपचे डॉ. लक्ष्मण इंगोले यांना केवळ स्वत:चे एक मत मिळाला. त्यांच्या उमेदवारी अर्जाला सूचक व आनुमोदक असलेल्या मतदारांनी पाठ फिरवली आहे.

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवर्षिक निवडणुकीची प्रक्रिया मतमोजणीने रविवारी (ता. चार ) पार पडली. बँकेच्या कार्यक्षेत्रत असलेल्या जिल्हातील सोळा तालुक्यात शुक्रवारी (ता दोन) मतदान घेण्यात आले होते. महाविकास आघाडी व भाजपच्या पॅनलमध्ये सरळ निवडणूक झाली. महाविकास आघाडीचे नेतृत्व पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले. भाजपा प्रणित पॅनलचे नेतृत्व खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले होते.

या बँकेच्या निवडणुकीत अर्धापूर तालुका सेवा सहकारी सोसायटीच्या मतदार संघातून एक संचालक निवडून द्यायचा होता. या मतदार संघात 24 मतदार होते. या सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार बाबुराव कोंढेकर व भाजपाचे डॉ. लक्ष्मण इंगोले यांच्यात सरळ लढत झाली. या सरळ लढतीत बाबुराव कोंढेकर यांनी 24 पैकी 23 मते घेवून एकतर्फी विजय मिळविला आहे.

भोकर विधानसभा मतदार संघातील भोकर तालुक्यातून काँग्रेसचे बाळासाहेब रावणगावकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर मुदखेडमधून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान संचालक गोविंदराव शिंदे नागेलीकर हे निवडून आले आहेत. या भोकर विधानसभा मतदार संघातील तिन्ही तालुक्यातून महाविकास आघाडीच्या पॅनलचे उमेदवार निवडून आल्याने पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिध्द झाले आहे.

अर्धापूर तालुक्यात बाबुराव कोंढेकर यांच्या विजयाबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. हा विजय खेचून आणण्यासाठी भाऊरावचे अध्यक्ष गणपतराव तिडके, श्यामराव टेकाळे, संजय देशमुख लहानकर, केशवराव इंगोले, तालुका अध्यक्ष बालाजी गव्हाने, शहराध्यक्ष राजु शेटे, भाऊरावचे संचालक प्रविण देशमुख, मोतीराम जगताप डाॅ. विशाल लंगडे, आदी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला.

नांदेड जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पप्पु पाटील कोंढेकर यांनी नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली. तसेच महाविकास आघाडीचे बबनराव बारसे, संतोष कपाटे, अशोक कपाटे, राष्ट्रवादीचे उध्दव राजेगोरे, चंद्रकांत टेकाळे, शशीकांत क्षिरसागर, अॅड सचिन देशमुख आदीनी आघाडी धर्म पाळत प्रचारात सहभागी झाले. तर डाॅ इंगोले यांनी एकाकी लढत दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidu Rashtra: भारत हिंदुराष्ट्र कधीपर्यंत होणार? डेडलाईन आली; शंकराचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं

तुलसी २.० ची पहिली झलक- ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी २’चा नॉस्टॅल्जिया पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!

Video : क्षणभराच्या रागात गेला जीव! निर्दयी माणसानं किरकोळ भांडणात तरुणाला धावत्या रेल्वेतून ढकललं; अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील रामवाडीमध्ये पेट्रोल चोराने जाळल्या सहा मोटरसायकल

'चला हवा...'मध्ये निलेशच्या जागी अभिजीतच्या दिसण्यावर श्रेया बुगडेची प्रतिक्रिया; म्हणाली- तुला एकच गोष्ट सांगायला आवडेल की...

SCROLL FOR NEXT