Dr. Vipin, IAS, Collector, Nanded sakal
नांदेड

नांदेड : विषमुक्त शेतीची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जिल्हाधिकारी हे जवळपास दोन तास शेतात रमले

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin, IAS, Collector, Nanded) यांनी शुक्रवारी (ता. सात) नैसर्गिक विषमुक्त शेतीसाठी (Natural toxin free) पाहणी दौरा केला. शहरास लागून असलेल्या विश्वनाथ होळगे यांच्या नैसर्गिक शेतात(Natural farm) पिकविल्या जाणाऱ्या विषमुक्त भाजीपाला, विविध फळे, गाजर, मुळा, पातीचे कांदे यांची पहाणी केली.

यावेळी त्यांच्या सोबत तहसीलदार व्यंकटेश मुंडे, जिल्हा कृषी अधीक्षक रवीशंकर चलवदे, तालुका कृषी अधिकारी श्री. घुमनवाड, गटविकास अधिकारी श्री. वावळे, ग्रामविकास अधिकारी श्री. नावंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य प्रवीण पाटील चिखलीकर, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदा शिंदे, शंकर ढगे तसेच गावकरी उपस्थित होते.

होळगे यांनी स्वागत केले आणि त्यांना नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याची टोपली भेट दिली. दरम्यान, जिल्हाधिकारी हे जवळपास दोन तास शेतात रमले. सर्व पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांसोबत चर्चा करत त्यांनी शेतातील गाजर आणि टोमॅटोचा आस्वाद घेतला. त्यांनी शेतकरी श्री होळगे यांच्याकडुन शेती करण्याचे तंत्र आणि वापरले जाणारे नैसर्गिक कंपोष्टखते याबद्दल विचारणा केली. नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली शेती पाहून शेतकऱ्यांना विषमुक्त भाजीपाला,फळे पिकवण्यासाठी प्रोत्साहित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT