file photo 
नांदेड

नांदेड : जिल्हा शिवसैनिकांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा केला निषेध  

प्रल्हाद कांबळे

नांदेड : दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवें यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. याचे पडसाद नांदेड शहरात उमटले असून जिल्हा शिवसेनेच्या वतीने शहराच्या आयटीआय चौक येथे श्री. दानवे यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे आमदार बालाजी कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्र सरकारने तीन कायदे पारित केले असून हे कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी शेतकरी गेल्या 17 दिवसापासून आंदोलन करित आहेत. या शेतक-यांच्या आंदोलनाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करुन शेतक-यांच्या भावना दुखविल्या आहेत. शहरातील आयटीआय चौकात दानवें यांच्या पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या प्रतिमेश चप्पल- बुटानी मारहाण करुन निषेध केला.

शेतकरी आपल्या हक्कासाठी लढत आसतांना केंद्रातील एका जबाबदार नेत्याने अन्नदात्याबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य न शोभनारे आहे. याबाबत त्यांनी देशातील तमाम शेतक-यांची माफी मागावी असे शिवसेनेच्या वतीने करण्यात आली. तसेच पेट्रोल, डिझेलची दरवाढ व तिन्ही कायदे त्वरीत मागे घेण्यात यावीत आशी मागणी करण्यात आली. 

यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, आमदार बालाजी कल्याणकर, शहरप्रमुख सचीन किसवे, प्रकाश मारावार, अशोक उमरेकर, मोज भंडारी, बालासाहेब देशमुख, जयंत कदम, दयाल गिरी, बालाजी सुनपे, राजू गोरे, गौरव कोडगिरे, शाम बन, नवनाथ काकडे, महेश खेडकर, नवज्योतसिंग गाडीवाले, नितीन सरोदे, महिला आघाडीच्या डाॅ. निकीता चव्हाण, निकीता शहापूरवाड आदींची उपस्थिती होती. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat प्रकरणात मोठा स्फोट! 58 नाही तर, 100+ व्हिडिओ असल्याची माहिती उघड, ‘तांत्रिक’ शोषणाचा काळाकुट्ट खेळ समोर

IPL 2026 Marathi News: बाळासोबत वेळ घालवायचाय... ७ सामने नाही खेळू शकणार स्टार गोलंदाज... नियमानुसार होणार बंदीची कारवाई?

Ashok Kharat Case : "सावित्रीची लेक जिथे भोंदू पावलांवर वाकली...." अमोल कोल्हेंची रुपाली चाकणकर यांच्यावर बोचरी टीका

दिवसभर ACमध्ये बसता? तुमची इम्युनिटी कमी होतेय का? काय काळजी घ्यावी जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : घनसावंगी तालुक्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट, शेतकऱ्यांचे नुकसान, भरपाईची मागणी

SCROLL FOR NEXT