file photo 
नांदेड

नांदेड : दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे वृद्ध महिलेची लुट टळली, दोन चोरट्यांना घेतले ताब्यात

प्रल्हाद कांबळे

नांदेड : शहराच्या श्रीनगर भागात एका वृद्ध महिलेला साडीचे व पैशाचे आमिष दाखवून मुख्य रस्त्यावरुन थोडे बाजूला घेऊन तिची दोन चोरटे लूट करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी गस्तीवर असलेल्या दामिनी पथकामुळे ही लुटमारीची घटना टळली. पोलिस फौजदार शालिनी गजभारे यांनी एका चोरट्यास ताब्यात घेतले. मात्र दुसऱ्याही चोरट्यास पाठलाग करुन ताब्यात घेतले. हा प्रकार शुक्रवारी (ता. २५) सकाळी ११ च्या सुमारास घडला. या प्रकरणी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद प्रक्रिया सुरु होती. 

नांदेड शहर उपविभागाचे दामिनी पथक शुक्रवारी (ता. २५) सकाळी अकराच्या सुमारास शहराच्या श्रीनगर भागात गस्त घालत होते. यावेळी एका वृद्ध महिलेची लुट होत असल्याची माहिती मिळताच पथकप्रमुख शालिनी गजभारे त्या तिथे पोहोचल्या. त्यांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. पसार होणाऱअया दुसऱ्याही त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले दामिनी पथकाच्या तत्परतेमुळे वृद्ध महिलेची होणारी लूट टळली. पथकाने सदर आरोपींना ताब्यात घेऊन महिलेसह भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले.

घडलेला प्रकार पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंके यांना सांगितला. यानंतर भाग्यनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सदर महिलेस आमचे मालक गरीब व वृद्ध महिलांना साड्या वाटप करत आहेत. तुम्हालाही एक साडी आणि बाराशे रुपये मिळवून देतो असे म्हणून या दोन चोरट्यांनी तिला मुख्य रस्त्यावरुन अंतर्गत रस्त्यावर (बोळीत) नेले. तिथे तिच्याकडून काही पैसे उकळण्याचा प्रयत्न करु लागले. ही माहिती मिळताच दामिनी पथकाच्या फौजदार शालिनी गजभारे आपल्या सहकाऱ्यांसह त्याठिकाणी पोचल्या. त्यांनी तात्काळ सदर महिलेला धीर देत एका चोरट्याला ताब्यात घेतले. 

भयभीत झालेल्या वृद्ध महिलेला श्रीनगर भागातील तिच्या घरी सोडण्यात आले. या घटनेची दखल पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी घेतली. अशा घटना होऊ नये यासाठी स्थानिक पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक आणि बीट हवालदार यांनी आपली गस्त वाढवावी अशा सूचना दिल्या. यापूर्वीच नांदेड ग्रामीण उपविभागामध्ये दामिनी पथकाच्कया राणी भोंडवेकडून नुकतीच गांजा विक्री करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. एकंदरीत शहरातील दोन्ही विभागातील दामिनी पथक सक्रिय झाल्याने महिला तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण कमी होत चालले आहे. शुक्रवारी (ता. २५) केलेल्या शहर दामिनी पथकाच्या कारवाईबद्दल पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले. एकंदरीत पोलिसांनी आपापल्या हद्दीमध्ये गस्त वाढवली तर नक्कीच अशा घटनांना आळा बसू शकतो असे सुज्ज्ञ नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Update: राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT