file photo 
नांदेड

नांदेड : भेंडेवाडी सरपंचपदाची निवड बिनविरोध- सुरेखा जायभाये यांना संधी

धोंडीबा बोरगावे

फुलवळ (ता. कंधार, जिल्हा नांदेड) : कंधार तालुक्यात एकानंतर एक ग्राम पंचायतच्या सरपंच पदाची निवड ही बिनविरोध होत असून हे एक सकारात्मक वैचारिक परंपरेचे प्रतीक म्हणून नावारुपाला येत असलेल्या गावांचा इतरांनीही आदर्श घ्यावा असेच म्हणावे लागेल. तालुक्यातील भेंडेवाडीच्या सरपंचपदी सुरेखा जायभाये यांची निवड करण्यात आली आहे.

यापूर्वी कंधार तालुक्यातील भोजूचीवाडी आणि नवघरवाडी या दोन गावातील मतदारांनी सकारात्मक विचारांची देवाणघेवाण करत आपापल्या ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची निवड ही बिनविरोध करुन दाखवली आहे. त्यातच बुधवारी (ता. २३) डिसेंबर रोजी याच तालुक्यातील कुरुळा गटातील ५५७ मतदार संख्या व सात ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेल्या भेंडेवाडी येथील ग्रामस्थ व मतदारांनी एकत्र येऊन हम कुछ कम नही असे म्हणत आपल्या गावच्या सरपंच पदाची निवड ही सर्वानुमते बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि तो सार्थकही करून दाखवला.

सरपंच पदाचे आरक्षण हे पुरुषाला सुटले तर कंधार पंचायत समितीचे माजी उपसभापती भीमराव जायभाये हे सरपंच राहतील किंवा आरक्षण महिलेला सुटले तर सरपंच म्हणून त्यांच्या पत्नी सुरेखा भीमराव जायभाये या राहतील असा सर्वानुमते निर्णय ग्रामस्थ व मतदारांनी घेतला आहे. तर उपसरपंच पदासाठी हणमंत जायेभाये यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर ग्रामपंचायत सदस्य म्हणून सारिका जनार्दन मुंडे, अंगद निवृत्ती जायेभाये, मारोती जायभाये, हरिबा जायभाये व सत्रुघ्न मुसळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

या निवडीसाठी माजी सरपंच माधव जायेभाये, अंकुश मुसळे व लटपटे, बालाजी कागणे, भगवान जायेभाये, बालाजी मुसळे यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करुन ही ग्राम पंचायत बिनविरोध केली. त्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन वर्षाव होत आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

CSK vs PBKS Live: चेन्नई सुपर किंग्स 'घरी'पण हरले! पंजाब किंग्सचे फलंदाज चेपॉकवर बरसले, श्रेयसचा संघ IPL 2026 Point Table मध्ये अव्वल

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

SCROLL FOR NEXT