file Photo 
नांदेड

नांदेडला शुक्रवारी ४० रुग्ण कोरोनामुक्त तर ४६ जण पॉझिटिव्ह 

शिवचरण वावळे

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या गंभीर रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचा दर घटला आहे. शुक्रवारी (ता. आठ) प्राप्त झालेल्या ९२४ स्वॅब अहवालापैकी ८७७ निगेटिव्ह तर ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तीन दिवसानंतर जिल्ह्यातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 

शुक्रवारी दिवसभरात जिल्हा शासकीय रुग्णालयात पाच, महापालिकेंतर्गत एनआरआय भवन, गृहविलगीकरणात असलेले - १७, नायगाव - चार, देगलूर - चार, मुखेड - एक, लोहा - दोन व खासगी रुग्णालयातील सात असे ४० रुग्ण औषधोपचाराने बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातुन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत उपचार घेऊन २० हजार ६३८ रुग्ण घरी परतले आहेत.

जिल्हाभरातील आतापर्यंत ५७७ बाधितांचा मृत्यू 

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या कोरोनाबाधित गंभीर रुग्णांपैकी शुक्रवारी कंधार तालुक्यातील हाडोळी येथील पुरुष (वय ६५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्हाभरातील आतापर्यंत ५७७ बाधितांचा मृत्यू झाला आहे. 

 ३९५ संशयित स्वॅब अहवालाची तपासणी सुरु 

नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात - २५, नांदेड ग्रामीण - चार, मुखेड - चार, लोहा - दोन, नायगाव - एक, माहूर - एक, अर्धापूर - पाच, परभणी दोन, हिंगोली दोन असे २२ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २१ हजार ७७२ इतकी झाली आहे. सध्या ३५६ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामधील आठ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ३९५ संशयित स्वॅब अहवालाची तपासणी सुरु होती. 

नांदेड कोरोना मीटर 

एकूण पॉझिटिव्ह - २१ हजार ७७२ 
एकूण बरे - २० हजार ६३८ 
एकूण मृत्यू - ५७७ 
शुक्रवारी पॉझिटिव्ह - ४६ 
शुक्रवारी बरे - ४० 
शुक्रवारी मृत्यू - एक 
उपचार सुरु - ३५६ 
गंभीर रुग्ण - आठ 
स्वॅब तपासणी सुरु - ३९५ 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

‘तुमचे पैसे पडले... म्हणत चार लाखांवर डल्ला! बँकेबाहेरच शेतकर्‍याची फसवणूक; 'एचडीएफसी'समोर दिवसाढवळ्या थरार...

GT vs PBKS: ४७ वर ५ विकेट्स, मग सुर्यांश शेडगे ठरला पंजाबसाठी संकटमोचक; गुजरातच्या वेगवान माऱ्यासमोर श्रेयस अय्यरचे शिलेदार ढेपाळले

खोटं बोलून नदी किनारी नेलं; नंतर जावयानं सासूला क्रूरपणे संपवलं, संतापजनक कारण समोर

Velhe Nasrapur Protest: नसरापूर अत्याचार प्रकरणाचा राजगड तालुक्यात तीव्र पडसाद; वेल्हे-पानशेतसह परिसर कडकडीत बंद

SCROLL FOR NEXT