file photo 
नांदेड

नांदेड : गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 जैसे थे ठेवावा- बोर्डाच्या आजी- माजी सचिवांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

प्रल्हाद कांबळे

नांदेड - नांदेड येथील सचखंड गुरूद्वारा बोर्डाच्या संदर्भातील गुरूद्वारा बोर्ड ऍक्ट 1956 चा कायदा जैसे थेच ठेवावा. त्यामध्ये बदल करू नये. तसेच कलम 11 मधील दुरूस्ती रद्द करावी, अशी मागणी गुरूद्वारा बोर्डाचे विद्यमान सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर आणि माजी न्यायाधीश परमज्योतसिंघ चाहेल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन केली आहे.

या संदर्भात उपरोक्त तिघांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची 6 डिसेंबर रोजी मुंबई येथे मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. याचवेळी पंजाबातील अकाली दलाचे नेते खा. प्रेमसिंघ मांजरा हे दलाचे अध्यक्ष प्रकाशसिंघ बादल यांचा शेतकरी आंदोलनाच्या संदर्भातील संदेश घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आले होते. दिल्लीच्या सिमेवर गेल्या बारा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहे.

आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत देशातील सर्व प्रादेशिक पक्षांचे नेते पुढील आठवड्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील दिल्लीला यावे, असा बादल यांचा संदेश खा. मांजरा यांनी दिला. त्याचवेळी नांदेडच्या शिष्टमंडळाचीही मुख्यमंत्र्यांशी भेट झाली.

यावेळी बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई, माजी सचिव रणजितसिंघ कामठेकर आणि न्या. परमज्योतसिंघ चाहेल यांनी गुरूद्वारा बोर्डाचा सन 1956 चा कायदा जैसे थे ठेवावा, त्यामध्ये काही बदल करू नये. तसेच कलम 11 मधील दुरूस्ती रद्द करावी. भाटीया आयोग लागू करू नये, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. तसेच यावेळी कामठेकर यांनी शेतकऱ्यांच्या सध्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याचे सरपंच संघटनेचे निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत सुमारे पाऊण तास झालेली भेट व चर्चा सकारात्मक होती, असे कामठेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhas River: धोक्याची घंटा! उल्हास नदीने गाठली इशारा पातळी; कल्याण-डोंबिवलीकरांवर पुराचे संकट, प्रशासनचा हाय अलर्ट

Driving Licence Rules : ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नियम बदलणार; बाईक, टॅक्सीसाठी १ ऑगस्टपासून अंमलबजावणीची शक्यता

Latest Marathi News Live Update : खेडमध्ये जगबुडी नदीला पुन्हा पूर

Gold Rate Today: सलग 5व्या दिवशी सोनं स्वस्त! 18 कॅरेट 1.08 लाखांवर; 22k आणि 24k सोनं किती रुपयांना?

Mumbai Heavy Rain : पावसााचा फटका! सलग चौथ्या दिवशी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; नेरळ-भिवपुरी रेल्वे रुळांवर पाणी, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT