file photo 
नांदेड

नांदेड : दिल्लीतील शेतकरी आंदोलनास गुरुद्वारा बोर्डाचा पाठिंबा ; लंगर सेवा सुरू 

प्रल्हाद कांबळे

नांदेड - केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनास गुरुद्वारा सचखंड बोर्ड तथा हजुरी संगतकडून पूर्णपणे पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायदे शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहेत.

सदरील कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले आहे. गेल्या अनेक दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनाची केंद्र सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. या शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, नवीन कृषी कायदे रद्द करावेत अशी मागणी करीत शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला गुरुद्वारा सचखंड बोर्ड तथा हजुरी संगतकडून पूर्णपणे पाठिंबा जाहिर करण्यात आला आहे. बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांच्या पुढाकाराने ५० सदस्यांची एक टिम लंगर व औषधी घेवून दिल्लीत दाखल झाली आहे. हुजूर साहेबचे मुख्य जत्थेदार सिंघ साहिब संत बाबा कुलवंतसिंघ यांचे अशिर्वाद व गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अध्यक्ष सरदार भूपींदरसिंघ मन्हास, उपाध्यक्ष गुरुविंदरसिंघ बाबा यांच्या सूचनेनुसार आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना लंगरसेवा, औषधी, चादर आदींची सेवा पुरविण्यात येत आहे. 

लंगर साहिब गुरुद्वाराचे मुख्य जथेदार संत बाबा नरेंद्रसिंघ एवं संत बाबा बलविंदरसिंघ यांनी पण शेतकरी आंदोलनास समर्थन दिले आहे. दिल्ली येथील आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना लंगरची व्यवस्था लंगर साहिबच्या वतीने करण्यात आली असून स्वतः संत बाबा नरेंद्रसिंघ हे दिल्लीत मुक्कामी आहेत. लाखो शेतकऱ्यांना सर्व सोयी उपलब्ध करून देत आहेत. सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या सेवेचे स्वागत होत आहे, गुरुद्वारा बोर्डाचे सचिव सरदार रवींद्रसिंघ बुंगई यांच्या नेतृत्वाखाली टीम अहोरात्र आंदोलनकर्त्या शेतकरी बांधवांना लंगर सहित वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. पंजाबहुन नानक- साई फाऊंडेशनची एक टीम सरदार रूपींदरसिंघ शामपुरा, मास्टर जोगिंदर सिंघ यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांची सेवा करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT