Rahul Gandhi  Esakal
नांदेड

Nanded Hospital News : भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही; राहुल गांधींची भाजपवर टीका!

Chinmay Jagtap

नांदेड जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयातल्या गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला असून यात 12 नवजात बालकांचा समावेश आहे. यावर आता विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत आहेत.

घडलेल्या घटनेविषयी ट्विट करत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाला किंमत नाही असे राहुल गांधी म्हणाले आहेत.

ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले आहेत कि, महाराष्ट्रा राज्यातील नांदेडच्या शासकीय रुग्णालयात औषधांच्या कमतरतेमुळे 12 नवजात बालकांसह 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. मी सर्व शोकग्रस्त कुटुंबांप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो.

भाजप सरकार प्रसिद्धीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करत आहे मात्र मुलांच्या औषधांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत? भाजपच्या नजरेत गरिबांच्या जीवाची किंमत नाहीये.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना म्हटले आहे कि, नांदेडमधील ही घटना अत्यंत दुर्भाग्यपूर्ण आहे. प्रकरणाची माहीती घेतली जाईल. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT