file photo 
नांदेड

नांदेड : पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेप; दोन्ही लेकरांची साक्ष ठरली महत्त्वाची

प्रल्हाद कांबळे

नांदेड : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीवर कुऱ्हाडीचे घाव घालून ठार मारणाऱ्या पतीस येथील प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी मंगळवारी (ता. १६) जन्मठेप व पाच हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. याप्रकरणात आरोपीच्या दोन्ही चिमुकल्यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. 

किनवट तालुक्यातील मोरगाव (वरचे) या ठिकाणीचंद्रशेखर चंपत वाघमारे हा आपल्या परिवासह राहत होता. तो आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. यातूनच त्यांचे सत वाद होत असत. पत्नीचा काटा काढण्याचे ठरवून ता. १६ ऑक्टोबर २०१८ रोजी रात्री दोन वाजता घरात आवाज झाल्याने त्या ठिकाणी असलेली त्यांची लहान तीन मुल जागी झाली. आणि त्यांनी पाहिले की त्यांचे वडील आईला कुऱ्हाडीने घाव घालून मारत होते. हा घटनाक्रम झाल्यानंतर मयत महिलेच्या माहेरच्या मंडळींना ही माहिती समजली आणि ते ता. १६ ऑक्टोबरच्या पहाटे मोरगाव येथे आले.

याप्रकरणी चंद्रकांत रामदास लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मोरगाव येथील चंद्रशेखर चंपत वाघमारे (वय ४०) याने आपली पत्नी सावित्रा चंद्रशेखर वाघमारे (वय ३५) हिचा कुर्‍हाडीचे घाव घालून खून केला आहे. सावित्रीच्या चारित्र्यावर चंद्रशेखरला संशय होता आणि त्यातून हा प्रकार घडला होता. किनवट पोलिसांनी या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. के. कांबळे यांनी केला. या प्रकरणी चंद्रशेखर चंपत वाघमारेला अटक झाली. वैद्यकीय कागदपत्रांमध्ये मयत सावित्राच्या कपाळावर, डोक्यावर आणि मानेवर कुऱ्हाडीचे गंभीर जखमा होत्या. आपल्या पत्नीला ठार मारुन चंद्रशेखर वाघमारे घराबाहेर असलेल्या वीज वितरण कंपनीच्या डीपीमध्ये आपले हात टाकून स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सबळ पुरावे जमा करुन व्ही. के. कांबळे यांनी चंद्रशेखर वाघमारेविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

न्यायालयात हे प्रकरण सत्र खटला क्रमांक २३/ २०१९ यानुसार चालले. न्यायालयात या प्रकरणी सात साक्षीदारांनी आपल्या जवाब न्यायालय समक्ष नोंदवला. त्यात मयत सावित्राची सतरा वर्षाची मुलगी आणि १४ वर्षाचा मुलगा यांनी आपल्या आईच्या मृत्यूची घटना न्यायालयासमोर मांडली. उपलब्ध पुराव्या आधारे प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम जगताप यांनी सावित्रीचा खून करणाऱ्या चंद्रशेखर चंपत वाघमारेला जन्मठेप आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने अॅड. रणजित देशमुख यांनी बाजू मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT