Nanded In Omicron background Rules Announced  Sakal
नांदेड

नांदेड : ओमिक्रॉनच्‍या पार्श्‍वभूमीवर नियमावली जाहीर

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; दोन व्यक्ती ओमिक्रॉनने तर एक कोरोनाबाधित

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कोविड (covid) या विषाणूचा ओमिक्रॉनचा (Omicron) प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांमध्ये जगभर पसरत आहे. राज्यात याचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नांदेड (Nanded) जिल्ह्यातही हिमायतनगर येथील दोन व्यक्ती या नवीन ओमिक्रॉन विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्‍ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासन आदेशान्वये जिल्‍ह्यात निर्बंध लादणे अत्यावश्यक आहे. आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार सक्षम प्राधिकारी म्‍हणून राज्‍य व्‍यवस्‍थापन समितीचे अध्यक्ष यांनी आदेश निर्गमीत केले आहेत. त्यानुसार नांदेड जिल्‍ह्यात निर्बंध लागू करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिले आहेत.

जिल्‍ह्यात या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करावे. सर्व सार्वजनिक ठिकाणी रात्री नऊ ते सकाळी सहा या वेळेत पाच पेक्षा जास्त लोकांच्या एकत्र येण्यास बंदी असेल. या निर्देशांतर्गत स्पष्टपणे अंतर्भूत नसलेल्या कोणत्याही क्रियाकलापाच्या बाबतीत, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी हे सामान्यत: या तत्त्वांचे पालन करून किंवा स्थानिक परिस्थितीच्या आधारावर, योग्य वाटल्यास, योग्य निर्बंध ठरवू शकतील. अशा परिस्थितीत, असे निर्बंध लागू करण्यापूर्वी जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापनाव्‍दारे पूर्व सूचना देण्‍यात येईल.

हे आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी ता. २५ डिसेंबर पासून लागू केले आहेत. या आदेशाचे पालन न करणारे नागरीक भारतीय दंड संहिता १८६० मधील व संदर्भ एक व दोन मधील तरतुदी नुसार शिक्षेस पात्र राहतील. आदेशाचे काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामीण भागात गट विकास अधिकारी तसेच नागरी भागात संबंधीत आयुक्त, महापालिका, नगरपालिका, नगर पंचायत मुख्याधिकारी तसेच जिल्‍ह्यातील सर्व संबंधीत कार्यालय प्रमुख यांची राहिल. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांची राहिल, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले आहे.

१८ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू

हिमायतनगर तालुक्यात ता. २२ डिसेंबर रोजी कोरोनाबाधित झालेल्या दोन रुग्णांचे स्वॅब जीनोम सीक्वेंसिंगसाठी राष्ट्रीय विषाणूजन्य रोग संशोधन संस्था पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असता प्राप्त अहवालानुसार हे दोन रुग्ण हे ओमिक्रोन या कोरोनाच्या नवीन प्रकारच्या उत्परीवर्तीत विषाणूमुळे बाधित झाले आहेत, असे निष्पन्न झाले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली आहे. जिल्ह्यात सोमवारी (ता. २७) प्राप्त झालेल्या ५८० अहवालापैकी एक अहवाल बाधित आला आहे. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या ९० हजार ५४२ एवढी झाली असून यातील ८७ हजार ८६९ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५५ आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के आहे. सध्या १८ रुग्ण उपचार घेत असून दोन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. सोमवारी जिल्ह्यातील दोन कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे.

नांदेड कोरोना मीटर

  • एकूण स्वॅब- सात लाख ९४ हजार १६८

  • एकूण निगेटिव्ह - सहा लाख ९० हजार ८६

  • एकूण बाधित - ९० हजार ५४२

  • एकूण बरे - ८७ हजार ८६९

  • एकूण मृत्यू - दोन हजार ६५५

  • उपचार सुरू - १८

  • अतिगंभीर प्रकृती - दोन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sugarcane Price : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्य सरकारकडून उसाच्या किमतीत वाढ, आता एका क्विंटलमागे किती रुपये मिळणार?

World Cup 2025, IND vs ENG: भारताला पराभूत करत इंग्लंडने मिळवलं सेमीफायनलचं तिकीट! हरमनप्रीत कौर-स्मृती मानधनाची झुंज व्यर्थ

Worli Fire: वरळीत भीषण आग! अनेक झोपड्या जळाल्या, आगीमागचं नेमकं कारण आलं समोर

Pune Fire : सदाशिव पेठेतील चव्हाण वाड्याला भीषण आग, चार घरांचे नुकसान; सुदैवाने जीवितहानी टळली

World Cup 2025, INDW vs ENGW: दीप्ती शर्माने घडवला इतिहास! 'असा' पराक्रम करणारी भारताची पहिलीच महिला क्रिकेटपटू

SCROLL FOR NEXT