Nanded Sakal
नांदेड

Nanded : वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केवळ आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांची नाही, तर...

मोबाइलमध्ये दंग पोलिसदादा शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये वाहतुक नियंत्रणासाठी पोलिस तैनात केले जातात.

सकाळ डिजिटल टीम

नांदेड - वाहन चालविताना मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सिट वाहन चालविणे, सिग्नल तोडून भरधाव जाणे, वाहतूक नियमांचे नेहमीच होणारे अशा प्रकारचे उल्लंघन वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या जीवावर बेतते.

या बेताल वाहतुकीने नागरिक बेजार झाले असून, याला आळा घालणार कोण?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत पोलिस, महापालिका आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांनी समन्वय ठेऊन कार्यवाही करण्याची गरज व्यक्त होत आहे.

भर चौकात उभे राहणारे अॅटो, वाढते अतिक्रमण तसेच फेरीवाल्यांमुळेही वाहतुकीची कोंडी होत आहे. नांदेड शहरात बेताल वाहतुकीने विळखा घातला आहे. वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी प्रशासकीय यंत्रणा आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांमध्येही इच्छाशक्ती हवी. अपघातांमध्ये अनेकांचा बळी जातो. अपंगत्वसुद्धा येते. या बेताल वाहतुकीने शहरात अनेक बळी गेले आहेत. त्यानंतरही शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही, हे नांदेडकरांचे दुर्दैव आहे.

मोबाइलमध्ये दंग पोलिसदादा शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये वाहतुक नियंत्रणासाठी पोलिस तैनात केले जातात. वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी व अधिकारी वाहतूक नियंत्रणासाठी फिरत असतात. मात्र, चौकाचौकातील वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त पोलिसदादा मोबाईलमध्ये दंग राहत असल्याने वाहतूक नियंत्रणाचा बोजवारा उडत आहे.

जड वाहनांची बंदी नावालाच

शहरात नियमबाह्यपणे प्रवेश करणाऱ्या जड वाहनांमुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. ट्रक कुठेही उभे करण्यात येत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जड वाहने उभी केल्याने हाणामारीच्या घटनाही घडतात. नमस्कार चौक, तरोडा नाका, छत्रपती चौक आदी परिसरात ट्रक मोठ्या प्रमाणात उभे असतात.

नियमांचे करा पालन

वाहन चालविताना सिग्नल तोडून पुढे जाऊ नका

चौकात रेड सिग्नल असताना झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहन थांबवा

सिग्नलवर वाहन उभे करताना आपल्या डाव्या बाजूकडील जागा मोकळी ठेवा

दुचाकीवर हेल्मेट वापरा, वाहनाची कागदपत्रे सोबत बाळगा

दुचाकी चालविताना ट्रिपल सिट चालवू नका

वाहनांच्या गतीवर नियंत्रण ठेवे

मद्यपान करून वाहन चालवू नका

नागरिकांनीही बनावे जबाबदार

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची जबाबदारी केवळ आरटीओ किंवा वाहतूक पोलिसांची नाही, तर वाहन चालकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याची जाणीव ठेवली पाहिजे. निव्वळ प्रशासकीय यंत्रणेला दोष देऊन चालणार नाही. जबाबदारी नागरिक म्हणून आपण वागण्याचा प्रयत्न करतो का? बेताल वाहतुकीला नावे ठेवताना आपणही त्याच बेताल वाहतुकीसाठी जबाबदार असणाऱ्यांपैकी एक आहोत, हे विसरून चालणार नाही. त्यामुळे वाहतूक नियमांचे पालन करणे प्रत्येक वाहन चालकाची जबाबदारी नाही तर कर्तव्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT