file photo 
नांदेड

नांदेड : भोकर तालुक्यातील देवठाणा परिसरात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला बिबट्या

प्रल्हाद कांबळे

नांदेड : भोकर तालुक्यातील देवठाणा येथे शुक्रवारी (ता. चार) रात्रीच्या वेळी बिबट्याने जनावराच्या गोठ्यावर केलेल्या हल्ल्यात वगार ठार झाले. यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


भोकर तालुक्यातील सोमठाणा, देवठाणा व सिंगारवाडी परिसरात दोन - तीन महिन्यापासून बिबट्याचा वावर वाढला आहे. अनेकवेळा  मेंढपाळांच्या निदर्शनास बिबट्या आल्यामुळे लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात जंगल नसल्यामुळे बिबट्याने शेतातील आखाड्यावर हल्ला करून जनावरे जखमी करीत असल्याच्या अनेक घटना परिसरात घडत आहेत. आठवड्यापूर्वी सिंगरवाडी येथील सहा महिन्याच्या वगारावर हल्ला करून फडशा पडला होता. या घटनेची वनविभागाने दखल घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्याचे दिसून आले.

दरम्यान देवठाणा येथे शुक्रवारी (ता. चार) रात्री तुकाराम काशिनाथ कस्तुरे यांच्या शेतातील आखाड्यावर दीड वर्षाच्या वगारावर हल्ला करून ठार केले. ही घटना शेतकऱ्याने स्वखर्चाने आखाड्यावर बसलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेचा वन कर्मचाऱ्यांना सुगावा लागताच वनपरिक्षेत्र अधिकारी बी. पी. आडे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल आनंद खटाने, वनरक्षक सहदेव दोसलवाड, वनरक्षक गोविंद जाधव यांनी पंचनामा केला. यावेळी देवठाणा येथील वैजनाथ कतुरे, अमृत शिंदे हजर होते. सध्या सर्वत्र रब्बी हंगामाचा जोर चालू असून गहू हरभरा आदी पिकांना पाणी देण्याचे काम चालू आहे रात्री-अपरात्री शेतकऱ्यांना शेतामध्ये जावे लागत असल्यामुळे सदर घटनेमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT