file photo 
नांदेड

नांदेड : विहिरीत पडलेल्या अस्वलाला जीवदान, वनविभागासोबत गावकऱ्यांचाही पुढाकार

प्रकाश जैन

हिमायतनगर (जिल्हा नांदेड) : उमरखेड तालुक्यातील परंतु हिमायतनगर तालुक्याच्या सिमेला लागून असलेल्या पैनगंगा अभयारण्य वनपरीक्षेत्रातील भवानी गावानजीक चिखली शिवारातील एका विहीरीत पडलेल्या अस्वलाला वन विभागाकडून जीवनदान मिळाले.

वन्यजीव विभागाच्या सुत्रानुसार गुरुवार (ता. १०) रोजी चिखली शिवारातील बाबुराव बेले यांच्या शेतातील एका जमीनस्तर असलेल्या विहिरीत अस्वल पडल्याची माहिती शेतमालकाने यांनी वन विभागाला दिली.  माहिती मिळताच तत्काळ कोरटा वन परिक्षेत्राचे वनपाल सुदर्शन पांडे आपल्या टीमसह घटनास्थळी हजर झाले. 

सदर अस्वल सकाळी खाद्य शोधासाठी फिरत असताना जमीनस्तर असलेल्या विहिरीत पडला.  वनकर्मचाऱ्यांनी लगतची सर्व शेती खाली करुन घेतली लगेच विहिरीत एक खाट दोरी बांधून विहिरीत सोडली. नंतर विहिरीत लाकडी शिडी सोडली आणि त्या शिडीच्या साहाय्याने अस्वल लगेच विहिरीबाहेर आले आणि जंगलात पळाले.
 
सदर अस्वलास कोरटा वनपरिक्षेत्र तर्फे रेस्क्यू ऑपरेशन करुन विहरीतुन जीवंत बाहेर काढण्यात आले. सदर कार्य  विनायक खैरनार वनपरिक्षेत्र अधिकारी कोरटा, हेमंत उबाले वनपरिक्षेत्र अधिकारी महागाव, ओमप्रकाश पेंडोर वनपरिक्षेत्र अधिकारी बिटरगाव यांचे मार्गदर्शनात एस. एस. पांडे वनपाल कोरटा, अजय राऊत वनपाल बिटरगाव, वनरक्षक श्रीराम खंदारे, बालाजी गुट्टे,  मंगल चव्हाण, अनिल राठोड यांच्या टिमने  केले तसेच या कार्यात दराटी पोलिस ठाण्याचे तसेच स्थानिक गावकरी यांनी सुध्दा मोलाचे सहकार्य केले.

संपादन - प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway: उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी! हडपसर-मुझफ्फरपूर रेल्वेला मुदतवाढ; डब्यांच्या रचनेतही बदल, २० जादा फेऱ्यांचे नियोजन

Asian Games Swimming : १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रिषभ दास सहाव्या स्थानावर; ५४.७७ सेकंदांची वेळ

Marathi News Live Updates : टिटवाळ्यात गणपती विसर्जन मिरवणुकीत राडा; ७० ते ८० जणांविरोधात गुन्हा

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT