nanded lok sabha election candidate nomination file last day Sakal
नांदेड

Lok Sabha Election : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; बुधवारी नऊ, एकूण २० अर्ज दाखल

बुधवारी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी (ता. ४) शेवटचा दिवस शिल्लक आहे. बुधवारी (ता. ३) दिवसभरात एकूण नऊ अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली आहे.

बुधवारी नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी नऊ अर्ज दाखल झाले आहेत. एका उमेदवाराने आतापर्यंत दोन अर्ज दाखल केल्यामुळे १९ उमेदवारांचे २० अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी दिवसभरात १९ अर्जांची उचल करण्यात आली आहे. आतापर्यंत १४५ अर्ज उचलण्यात आले आहेत. अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे.

बुधवारी दाखल झालेल्या अर्जांमध्ये वसंतराव चव्हाण (काँग्रेस), अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी), शेख मोईन शेख रशीद (ऑल इंडिया मजलिस-ए-इन्कलाब-ए-मिल्लत) यांच्यासह लक्ष्मण नागोराव पाटील, तुकाराम गणपत बिराजदार, मोहम्मद वसीम, मोहम्मद सिद्दिकी शेख संदलजी, भास्कर चंपतराव डोईफोडे आणि असलम इब्राहिम शेख (सर्व अपक्ष) यांचा समावेश आहे.

अर्जांची छाननी शुक्रवारी होणार

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात नांदेड लोकसभेची निवडणूक होत आहे. ता. २८ मार्च ते ता. ४ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहेत. गुरुवारी एक दिवस अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यानंतर अर्जांची छाननी शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकराला जिल्हाधिकारी परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन सभागृह येथे करण्यात येणार आहे. उमेदवारी मागे घेण्याबाबतची सूचना उमेदवारांना सोमवारी (ता. ८) दुपारी तीनपर्यंत देता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Savitribai Phule Jayanti: संघर्षातून घडलेली क्रांती! सावित्रीबाई फुलेंचे 10 विचार बदलतील तुमचं विचारविश्व

Gemini Horoscope : यशासाठी झगडल्याशिवाय पर्याय नाही, नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, पण..; मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष?

Uddhav Thackeray : दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही

SCROLL FOR NEXT