एसपी नांदेड 
नांदेड

नांदेड : रोहीपिंपळगावात सामाजिक शांतता कायम राखा- प्रमोदकुमार शेवाळे

यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसापूर्वी रोहीपिंपळगावात काही शुल्लक कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण झाले होते.

सकाळ वृत्तसेवा

मुदखेड (जिल्हा नांदेड) : मुदखेड तालुक्यातील रोहीपिंपळगाव (Mudkhed Tohipimpalgaon) येथे कायदा व सुव्यवस्था ( Law and order) मोडीत काढण्याच्या ज्या दोन घटना नुकत्याच झाल्या त्या अनुचित नाहीत कायदेशीर बाबी समोर आल्यानंतर संबंधितांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करुन दोनही घटनेतील आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. कायदा व सुव्यवस्था मोडीत काढणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत कोरोना- १९ (Recent covid situation) चे भान ठेवून रोहिपिंपळगावाात सामाजिक शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी रोहिपिंपळगाव येथे गुरुवारी (ता. सहा) बोलताना केले. Nanded: Maintain social peace in Rohipimpalgaon- Pramod Kumar Shewale

यावेळी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. काही दिवसापूर्वी रोहीपिंपळगावात काही शुल्लक कारणावरून दोन समाजात तेढ निर्माण झाले होते. गृह व महसूल प्रशासनाकडून गावात शांतता कायम राखण्यासाठी मुदखेडचे तहसीलदार दिनेश झांपले, पोलिस निरीक्षक महेश शर्माही सतत प्रयत्नशील आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता रोहिपिंपळगाव येथे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शर्मा यांनी पोलिसांची कुमक वाढवून फिक्स पॉईंट येथे लावण्यात आले आहेत.

हेही वाचा - विधायक बातमी : श्री गोवर्धन गोसेवा प्रकल्पामार्फत शांतीधाम गोवर्धनघाटला १० हजार गोवर्‍यांचे दान

ता. २० एप्रिल रोजी विद्युत डीपीची घटना व ता. २७ एप्रिल रोजी ॲट्रॉसिटी दाखल झालेला गुन्हा या दोन कारणावरुन रोहिपिंपळगाव हे चांगलेच चर्चेत आले आहे. विकास समाजावरील बहिष्काराची बाबही चर्चिल्या गेली. त्यानंतर सदर प्रकरण ऑन दी स्पॉट घेण्याच्या अनुषंगाने ता. सहा मे रोजी दुपारी रोहिपिंपळगावला जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर व जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी भेट देऊन. गावातील दोन्ही समाजातील नागरिकांशी संवाद साधला व शांततेचे आवाहन केले जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर यांनी देखील आपले गाव असल्यामुळे आपसात वाद न करता गावपातळीवर सामंजस्य व शांतता ठेवण्याची साद आपल्या भेटीदरम्यान रोहिपिंपळगाव वासियांना घातली.

अन्यथा कायदेशीर कारवाई करा- शेवाळे

सोशल मीडियावर किंवा प्रत्यक्ष रोहिपिंपळगावाला गावाबाहेरील व्यक्ती भेट देऊन दोन समाजात जातीय द्वेषभावना निर्माण करणारे वक्तव्य करून रोहिपिंपळगावात जर सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना आपल्या रोहिपिंपळगाव भेटीदरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी मुदखेड पोलिसांना केली. यावेळी आर्धापुर ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख, तहसीलदार दिनेश झांपले, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश वटाणे यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT