Malegaon Yatra sakal
नांदेड

Nanded News: माळेगाव याञा दक्षिण भारतातील ही यात्रा निव्वळ कागदोपत्री....

लोककलावंतांना राजाश्रय नाही; सत्ताधाऱ्यात कलगीतुरा ही नित्याची बाब

बा.पु. गायखर

लोहा : प्रशासकीय स्तरावरील माळेगाव यात्रा ही दक्षिण भारतात लोककलावंत, भटके आणि घोड्यांचा बाजारासाठी प्रसिद्ध आहे.  अलीकडच्या काळात तीर्थक्षेत्र विकास, कला महोत्सव,लावणी महोत्सव, उंट,  घोडे, गर्दभ, लालकंधारी,  देवणी पशुंचा बाजार या गोष्टी निव्वळ कागदोपत्री बनत चालल्या आहेत. महिनाभर चालणारी यात्रा केवळ पाच दिवसावर येऊन ठेपली आहे. जिल्हाधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि स्थानिक नेत्या-   सत्ताधाऱ्यात मोठेपणासाठी लागलेला कलगीतुरा आणि लोककलावंतांची होणारी बेपर्वाई परवड या गोष्टी वेदना देणाऱ्या आहेत. 

सन 1970 पर्यंत लोककला कलावंतांबरोबरच भटके आणि विमुक्त जमातींना त्यांच्या परंपरांच्या समसामर्थ्यावर परंपरा, समाज गटाचे संघटन  याञेतून टिकून ठेवता आले. भटक्यांच्या जातपंचायत मधून जबर शिक्षा नष्ट झाली असली तरी न्यायदानाची जागृती पूर्णतः कमी झाली नाही . जात पंचायती आजही कायम आहेत पण फरक एवढाच की या भटक्यांच्या न्यायदानात कायद्याची भीती निर्माण झाली आहे.

सर्वात जास्त अन्याय हा भटक्यांच्या महिलेवर होत असतो. जबर शिक्षेपायी ही संकल्पना नष्ट होते आहे. माळेगाव यात्रेत महाराष्ट्रभरातून विशेषतः सोलापूर, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातून येणारे भटके वर्षभरातील जीवनावर चर्चा करत असतात भटक्या स्त्रियांचे शिक्षण, बालविवाह, कठोर शिक्षा, समाजात झालेली प्रगती याबद्दल प्रशासन स्तरावर भटक्यांच्या परिषदा भरवायला हव्यात. यात्रेदरम्यान विविध स्पर्धा शर्यतींचे तसेच पाळीव प्राण्यांच्या व्यापारातून फार मोठी उलाढाल होत असते.

माळेगाव यात्रेत सन 1970 पर्यंत 67 लोक कलावंतांच्या ,तमासगिरांच्या राहुट्या येत असत. आज मितीला  राज्यातील अकरा तमाशा फडांपैकी  केवळ चार ते पाच तमाशा फड  येथे हजेरी लावतात. या तमाशा फडातील कलावंतांचा, खानपान, मजुरांचा खर्च खूप मोठा असतो. त्याची उत्पन्नही निघत नाही. विशेषतः तमाशा फडांना राजाश्रय नाही.  अर्थिक हालाकित सापडलेल्या तमाशा फड संघटनेत प्रचंड दुही असल्याचे दिसून येते. 

तमाशा फड संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर हे संघटन कौशल्यातून लोककला जतन ठेवण्यात वाकबगार आहेत. मात्र त्यांचेही पाय ओढले जातात. राजे शासनाने या तमाशा फडांना राजाश्रय दिला तर  हे तग धरून राहतील. संगीत बारी असलेल्या छोट्या कलावंतांना भिकेने तडफडण्याची फारशी वेळ येत नाही. कोरोना सारख्या काळातही त्या तग धरून आहेत. खेळाची बाब म्हणजे, लावण्या, लोकगीत यांच्या पेक्षा इंग्रजी आणि उडत्या चालींचे गाणे समोर येत असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

यात्रा काळा त कला महोत्सव आणि लावणी महोत्सव यात जास्त राजकीय रंग भरू लागला आहे. मानापमानाच्या स्वार्थापोटी कलावंतांची भूमिका स्पष्ट होत नाही . यापेक्षा राजकीय कलगीतुराज अधिक पहावयास मिळतो आहे. लावणी महोत्सवात दिग्गज लोककलावंतांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत होता, तोही बंद करण्यात आला आहे. राज्य शासनाकडून यासाठी अधिक बजेट का मागवले जात नाही. प्रत्यक्षात पावसाळा संपल्यानंतर अनेक वेळा लोककलावंतांचे परिसंवाद या ठिकाणी घेता येतील मात्र त्यासाठी कोणी ठराव मांडत नाही. अकलूजच्या धर्तीवर लावणी महोत्सव सुरू व्हावा. लोक कलावंतांना निमंत्रण पत्रिका देऊन त्यांचा सन्मान व्हावा .

सत्ताधारी दाजी-भाऊजींच्या कलगीतुऱ्यात यात्रेचे मोठेपण लपून बसल  आहे. तीर्थक्षेत्राचा विकास निधी नियोजनपूर्वक टप्प्याटप्प्यात हवा. दर आठवड्याला आठवडी बाजार भरावा. सारंगखेड्याच्या धर्तीवर घोडेबाजार असावा. लोककलावंतासाठी वेगवेगळे प्रकल्प तयार व्हावेत. पठ्ठे बापूराव रंगमंच, कुस्ती आखाडे, लाल कंधारी, देवणी संशोधन प्रकल्प, कृषी- शिक्षण क्षेत्रातील संशोधन मंडळ उभारण्यात यावेत. असे झाले तरच पुन्हा एकदा दक्षिण भारतात माळेगाव यात्रा जगाचा नकाशावर असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : अमित शहांचा आज पुणे दौरा, वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT