नांदेड - जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या गेल्या २४ तासात सरासरी १६.४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण २१६.२० मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्या दोन चार दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांनी देखील पेरणीला सुरूवात केली आहे.
जून महिन्यात फारसा पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंतेत होते. जुलै महिना सुरू झाल्यापासून गेल्या चार दिवसात कमी अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे पेरणीला वेग आला आहे. नांदेड शहर आणि परिसरातही गेल्या दोन चार दिवसांपासून पाऊस सुरू झाला असून वातावरणातही फरक पडला आहे.
मात्र, महावितरणकडून पावसाला सुरूवात झाली की काही भागात विद्युत पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष करून लहान मुले आणि ज्येष्ठांना त्रास सहन करावा लागत आहे.
जिल्ह्यात मंगळवारी सकाळी दहा वाजता संपलेल्या गेल्या २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडेवारी एकूण पावसाची आहे. नांदेड - ३५.५० (२१५.४०), बिलोली - ४.८० (१६०.६०), मुखेड - १४.८० (२६५.४०), कंधार - १२.७० (२९९.४०), लोहा - १४.१० (२२०.३०), हदगाव - १२.२० (१७३.३०), भोकर - २२ (१५६.१०), देगलूर - ६.५० (२६१), किनवट - १९.६० (२४०.५०), मुदखेड - ३३.३० (२६५.७०), हिमायतनगर - १५.६० (२९८), माहूर - २१.६० (१६६.४०), धर्माबाद- ७.८० (१६४.६०), उमरी- १४.५० (२०१.४०), अर्धापूर- २३.४० (१६३.३०), नायगाव- ७.२० (१३८.६०) मिलीमीटर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.