filtered water
filtered water  sakal
नांदेड

नांदेड : अर्धापूरसह मुदखेड,भोकरसाठी पाणीयोजना

सकाळ वृत्तसेवा

अर्धापूर : भोकर विधानसभा मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यासह भोकर, मुदखेड या तीन तालुक्यातील पाणी टंचाई कायमची दूर व्हावी यासाठी तीन तालुक्यातील १८२ गावासाठी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विचाराधीन असून यासाठी सुमारे साडेसातशे कोटी खर्च अपेक्षित आहे. या योजनेला तत्त्वतः मान्यता मिळाली असून एक बैठक सुद्धा झालेली आहे. या योजनेतून १८२ गावातील सध्याच्या सुमारे तीन लाख नागरिकांना व भविष्यात ३० वर्षांत वाढवणारी लोकसंख्या गृहीत धरून सुमारे साडे पाच लक्ष नागरिकांसाठी ही योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेतून शुद्ध पाणी पिण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या योजनेचा आराखडा तयार करण्यात येत आहे.

दर वर्षी पाणी टंचाई, तीच ती कामे, होणार खर्च टाळता येईल अशा उपाययोजना करणे आवश्यक आहेत. पाण्याचे शाश्वत स्तोत्र असणे गरजेचे आहे. सध्या तालुक्यामध्ये शाश्वत स्त्रोत नाही. जे बंधारे, तलाव आहेत ते काही मोजक्याच गावाची तहान भागवू शकतात. योजनेतून उन्हाळ्यामध्ये पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. विहीर आणि भुजला वर अवलंबुन राहण्यापेक्षा शाश्वत स्त्रोत घेऊन एखादी प्रादेशिक योजना राबविणे गरजेचे आहे. ग्राम पंचायत स्तरावर ज्या पाणी पुरवठा योजना आहेत, त्याचा विजबिलाचा आणि मनुष्यबळाचा खर्च पण ग्रामपंचायत यांना परवडत नाही. प्रादेशिक योजना राबवल्यास ग्रामपंचायतींना कमी खर्चात शुद्ध फिल्टर वॉटर मिळू शकेल. केंद्र आणि राज्य शासन यांच्या सहभागाने जल जीवन मिशन अंत्तर्गत राज्य भरात पाणीपुरवठा योजनेचे कामे हाती घेण्यात आलेले आहेत.

प्रादेशिक पाणी पुरवठा योजना विचाराधीन असून या योजनेला तत्त्वतः मान्यता दिली आहे. या योजनेचे विविध टप्पे बाकी असून गेल्या महिन्यात सादरीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सल्लागार अभियंता दीपक मुळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: सलमान खान गोळीबार प्रकरणी दोघांना ३० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Sankarshan Karhale: "उद्धव ठाकरेंचा फोन आला अन् राज ठाकरेंनी घरी बोलवलं"; राजकारणावरील कविता सादर केल्यानंतर काय-काय झालं? संकर्षणनं सांगितलं

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

IPL, LSG vs RR: संघाचा विजय, पोराची पहिली फिफ्टी अन् कुटुंबाचं सेलिब्रेशन; पाहा राजस्थानच्या जुरेलचा स्पेशल Video

Latest Marathi News Live Update: मध्य रेल्वेच्या ३० समर स्पेशल ट्रेनला मुदतवाढ

SCROLL FOR NEXT