नांदेड : प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून sakal
नांदेड

नांदेड : प्रेम प्रकरणातून तरुणीचा खून

नांदेडमधील घटना, संशयितास बेड्या

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : प्रेम प्रकरणातून तरुणीचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी (ता.२४) सकाळी शहरातील शारदानगर भागात घडली. पळून जाणाऱ्या संशयितास पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

शारदानगरातील अॅड. हरदळकर यांच्या इमारतीत संजयसिंग गौर भाड्यान राहतात. आज सकाळी ते नेहमीप्रमाणे आपल्या खासगी नोकरीनिमित्त घराबाहेर पडले. पत्नी कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यांची मुलगी वैष्णवी संजयसिंग गौर (वय २०) ही घरी एकटीच होती. ही संधी साधून सुरेश देविदास थेंडगे (वय २४, रा. पांगरी, ता. नांदेड) हा तिच्या घरी गेला. यावरून दोघांत वाद झाला. थेंडगेने धारधार हत्याराने वैष्णवीच्या गळ्यावर सपासप वार केले.

त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी माहिती देताच विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पळून जात असलेल्या थेंडगेला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. संजयसिंह गौर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला. थेंडगेला अटक केली असून सोमवारी (ता.२५) न्यायालयात हजर केले जाणार आहे. इमारतीवरून फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट ! हवामान खात्याचा मोठा इशारा, जाणून घ्या राज्यात आज कसे असेल हवामान?

दक्षिण आफ्रिका : गांधी, संघर्ष आणि मैत्रीचा शतकभराचा प्रवास

Maratha Reservation: मराठा समाजासाठीच्या योजनांमध्ये कपात नाही: मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती; शेतकऱ्यांना जूनअखेरपर्यंत कर्जमाफी..

Krishna Sugar Factory: कृष्णा कारखान्यासाठी आजपासुन धुमशान; उमेदवारी अर्ज आजपासुन २२ मे पर्यंत दाखल करता येणार, भोसले विरुद्ध मोहिते पुन्हा संघर्ष..

Satara Politics: सातारा पालिकेतील वादावर शिवेंद्रसिंहराजेंचा दणका; उदयनराजेंनंतर शिवेंद्रसिंहराजेंचीही बैठक, 'निवडून आणलं, पाडूही शकतो'..

SCROLL FOR NEXT