medical officers sakal
नांदेड

Nanded News : वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त, अपुरा औषधीसाठा; मुक्रमाबाद आरोग्य केंद्राची व्यथा

वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अनेक पदे रिक्त ः औषधीसाठा अपुरा, रुग्णांना सोसावा लागतो आर्थिक भुर्दंड

विनोद आपटे

मुक्रमाबाद : देगलूर ते रेणापूर राष्ट्रीय महामार्गावर आणि कर्नाटक व तेंलगाना राज्याच्या सिमेवर असलेल्या मुक्रमाबाद येथे नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे व त्यांना आरोग्याच्या चांगल्या व वेळेवर अल्पदरात उपचार मिळावा यासाठी याठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची व आरोग्य उप केंद्राची निर्मिती करून करोडो रूपये खर्ची करून भव्यदिव्य अशा इमारती उभ्या केल्या आहेत.

पण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैधकीय अधिकाऱ्यांना प्रतिनियुक्त्यांच्या ठिकाणी जावे लागत आहे. त्यात अपुरा औषधी साठा व इतर कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या त्यामुळे गरीब रुग्णांना वेळेवर व मोफत उपचार भेटत नसल्यामुळे येथील आरोग्य यंत्रणाच सलाईनवर असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

मुक्रमाबाद शहराचा वाढता विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन व शेजारीच असलेल्या कर्नाटक व आंध्रप्रदेशासह आसपासच्या ४० ते ५० गावचा रोज व्यापार, शिक्षण, शासकीय यासह इतर दैनंदिन कामासाठी रोज मुक्रमाबादला संपर्क येत असतो. त्यात रुग्णांची संख्या मोठी असल्यामुळे याठिकाणी शासनाने २०१६-१७ मध्ये करोडो रूपये खर्ची करून प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी केली.

येथे दोन वैद्यकीय अधिकारी कायम असायला हवे; पण येथील वैधकीय अधिकारी अक्षय परदेशी यांना बाऱ्हाळी तर दुसरे वैद्यकीय अधिकारी महेश खेंगठे, यांना सावरमाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा अतिरिक्त कार्यभार सोपावलेला आहे. तर तिसरे वैद्यकीय अधिकारी म्हणून अस्मा शेख, यांची नेमणूक आहे.

पण या नांदेडहून येणे-जाणे करतात. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणताही वैद्यकीय अधिकारी हजर राहात नाही. शिवाय आरोग्य सेविका, आरोग्य साहाय्यक, आरोग्य साहाय्यिका, अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यात भर म्हणून आहेत ते कर्मचारी काम चुकार व कारणे सांगणारी त्यामुळे शहरातील व परिसरातून दुरवरून येणाऱ्या रूग्णांला वेळेवर उपाचार मिळणे दुरापस्त होऊन बसलेले आहे.

शेजारीच असलेल्या दापका येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. पण येथील काम कासवगतीने चालू आहे. तर येवती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पुर्ण उभारणी झाली असून ८० टक्के कर्मचाऱ्यांची पदेही भरण्यात आली आहेत. या कर्मचाऱ्यांना वेतनही चालू आहे. पण ही दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वीत झाली

नसल्यामुळे येथील रूग्णांचा भार हा आपसूकच मुक्रमाबाद प्राथमिक आरोग्य केंद्रावर पडत आहे. सध्या पाळसाळ्याचे दिवस अशा काळात प्राथमिक आरोग्य केंद्राकडून स्वच्छतेचे महत्त्व पटवून देऊन पाणी, रक्त नमुने घेऊन त्यांच्यावर उपचार करणे गरजेचे असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्राकडून साथीचे रोग रोखण्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न करण्यात येत नाहीत.

शस्त्रक्रियेसाठी आलेल्या मातांचा जीव धोक्यात

येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून पाच वर्षही पुर्ण झालेली नाहीत तरीही या इमारतीचा स्लॕब ठिकठिकाणी कोसळत आहे. शस्त्रक्रिया कक्षाला गळती लागलेली आहे. तर बाळांत कक्षही असुरक्षित असल्यामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी आलेल्या महिलांचा व तपासणीसाठी व प्रस्तुतीसाठी आलेल्या मातांचा मात्र जीव धोक्यात आलेला आहे.

आपतकालीन उपचार नाहीच

मुक्रमाबाद राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे याठिकाणी रोजच छोटे -मोठे अपघात होणे ही, नित्याचिच बाब बनलेली आहे. अपघात, सर्पदंश, विषारी द्रव्ये, जाळपोळ झालेल्या अशा अपातकालीन रूग्णांवर कुठलेच उपाचार केले जात नाहीत. उलट त्या अशा रुग्णांवर लवकर उपचार केला तर तो वाचेल असे सांगून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवून आपली जबाबदारी झटकून टाकत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT