nanded news  sakal
नांदेड

Nanded News : आगारातून आज एकही बस धावणार नाही

जालना येथील घटनेचा परिणाम : सलग दुसऱ्या दिवशीही बस धावल्याच नाहीत.

सकाळ वृत्तसेवा

नांदेड - जालना जिल्ह्यात मराठा समाज बांधवांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा राज्यभरात मोठ्या प्रमाणात पडसाद उमटलेले आहेत. नांदेडमध्येही त्याचे पडसाद उमटले असून, शनिवारी (ता.दोन) फक्त जिल्हांतर्गत बसेसच्या फेऱ्या झाल्यात. परजिल्ह्यात एकही बस सोडण्यात आली नव्हती.

शिवाय दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारीही (ता.तीन) फक्त माहूर, भोकर आणि देगलूर येथेच बसेस सोडण्यात आल्याने परजिल्ह्यात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

अनेक प्रवाशांना बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. याबाबत प्रवाशांना कुठलीच माहिती अनाउंसमेंटद्वारे दिली नसल्याने प्रवाशांना शनिवारी बसस्थानकात ताटकळत बसावे लागले.

रविवारीही हीच परिस्थिती होती. सोमवारी (ता.चार) सकल मराठा समाजाच्या वतीने नांदेड बंदची हाक दिल्याने आगारातून बस सुटणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. नांदेड विभागीय बसस्थानकातून प्रवाशांच्या सोईसाठी १८४ फेऱ्या रोज होतात.

परंतू, शनिवारपासून सुरु झालेल्या मराठा आंदोलनामुळे राज्य परिवहन महामंडसळाच्या नांदेड विभागीय कार्यालयाकडून लातूर, बीड, सोलापूर, गंगाखेड, छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, परभणी, जिंतूर, हिंगोली, अकोला, नागपूर, यवतमाळ, वसमत आदी ठिकाणी जाणाऱ्या बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. आगाराचे आठ ते नऊ लाखा रुपयांचे नुकसान झाल्याचे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले आहे.

तरच जिल्हांतर्गत बसेस सोडू

ग्रामीण भागातील प्रवाशांची गैरसोय होवू नये यासाठी पोलिस प्रशासनासह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसारच जिल्हाअंतर्गत बसेस चालविण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. कंधार व लोहा तालुक्यात बससेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार जिल्हाअंतर्गत बसेस सोडण्यात येतील, अशी माहिती वाहतूक निरीक्षक यासिन हमीद यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Graded Driving License: काय आहे ग्रेड आधारित ड्रायव्हिंग लायसन्स? वाहतूक नियम भंग केल्यास रद्द होणार; नितीन गडकरी यांची घोषणा!

Latest Marathi News Live Update : आटपाडीचे पंचायत समितीचे नूतन सदस्य तृतीयपंथी दिलीप हेगडे यांचे हृदयविकाराने निधन

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! महाराष्ट्रात 1 तोळ्याचा भाव किती? पाहा आजचा ताजा भाव

Chandra Grahan 2026: गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी 'या' गोष्टी टाळाव्यात

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानकडून अफगाणिस्तानविरुद्ध 'थेट युद्धा'ची घोषणा; काबुल आणि कंदहारमध्ये हवाई हल्ले

SCROLL FOR NEXT