Nanded Power outage continues mseb mismanagement
Nanded Power outage continues mseb mismanagement Sakal
नांदेड

नांदेड : शहरात वीजपुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरुच

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : गेल्या चार दिवसांपासून शहरात कुठे ना कुठे वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरुच आहे. शहरातील तापमान गत काही दिवसांपासून ४३ अंश सेल्सिअसवर गेले आहे. अशा या उकाड्यात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने महिवातरण विरोधात नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.

मे महिन्यात शहरातील तापमान दरवर्षी जास्तच असते. यंदाही गत काही दिवसांपासून ४३ अंश सेल्सिअसवर तापमान जात आहे. अशा उकाड्यात घरातील पंखा, कुलरसुद्धा काम करत नाही. त्यामुळे आधीच नागरिक उकाड्याने त्रस्त असतात. अशा वातावरणात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचा महावितरण विरोधात संताप वाढत चालला आहे.

गेल्या चार दिवसांपासून कधी एक तास, कधी दोन तर कधी चार तास असा वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे शहरात एकप्रकारे अघोषित भारनियमन सुरु असल्याचा हा प्रकार आहे. रात्री किंवा दुपारी कधीही वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची रात्रीची झोपमोड होत आहे. पावडेवाडी, कौठा, तरोडा नाका तसेच देगलूर नाका परिसरासह नांदेड शहराच्या विविध भागातही वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार वाढला आहे.

ग्रामीणसह शहरातही वीज पुरवठा खंडित होत असेल तर महावितरणचे नियोजन योग्य प्रकारे नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांमध्ये महावितरण विरोधात रोष निर्माण होत चालला आहे. भर उन्हाळ्यात वीजअभावी घरातील लहान मुले, ज्येष्ठांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणणे योग्य नियोजन करावे अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT