nanded Sakal
नांदेड

Nanded : पावसाळा लांबल्याचा फटका...

जिल्ह्यात सहा टँकरने पाणी पुरवठा; २११ गावांत २७० विहिरींचे अधिगृहण

सकाळ डिजिटल टीम

Nanded - जिल्ह्यात यंदा पावसाळा लांबल्याचा फटका ग्रामीण भागाला बसला आहे. जिल्ह्यातील चार गावे व चार वाड्यांना सहा टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील २११ गावातही टंचाईमुळे २७० विहिरींचे अधिगृहण करण्यात आले आहे.

दरम्यान, दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे काही भागात समाधानकारक स्थिती असून शेतकऱ्यांनी पेरणीला सुरूवात केली आहे.जिल्ह्यात सलग दोन वर्ष वार्षिक सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवली नाही. यंदा जिल्ह्याला अधिक टंचाई जाणवेल असे वाटत होते. परंतु जूनमध्ये पावसाने पाठ फिरविल्यामुळे काही भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई जाणवू लागली. आजही अनेक भागात समाधानकारक पाऊस झाला नाही.

परिणामी भूजल पातळी खालावल्याने अनेक विहिरी व कुपनलिकेचे पाणी आटले आहे. यामुळे प्रशासनाने जिल्ह्यातील चार गावांसह चार वाड्यांना सहा टँकरव्दारे पिण्याचे पाणी पुरवठा करावा लागत असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील टंचाई निवारण कक्षातून मिळाली

यासोबत २११ गावात २११ विहीरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. यात टँकरसाठी सहा टँकर व्यतिरिक्त २६४ विहीरींचे अधिगृहण करण्यात आले आहे. आगामी काळात समाधानकारक पाऊस झाला तर टँकरसह अधिगृहीत विहिरींची संख्या कमी होईल, अशी माहिती महसूल प्रशासनाच्या सूत्राने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : मोनोरेल बंद, मेट्रोतही तांत्रिक बिघाड; घाटकोपर रेल्वे स्थानकावर उसळली प्रवाशांची गर्दी

'त्या घटनेनंतर मी खूप रडलो होतो' अभिनेता राजकुमार राव स्पष्टच बोलला, म्हणाला, 'आम्हाला काय भावना नाहीत का?'

Latest Maharashtra News Updates : चांदोरीतील गोदावरी नदीपात्राच्या बाहेर पाणी, खंडेराव महाराज मंदिराला पाण्याचा वेढा

Cyber Security : जगभरात चक्क १६ अब्ज पासवर्ड झाले लीक; भारत सरकारने दिला इशारा, तुमचं अकाऊंट सुरक्षित करा एका क्लिकवर..

Beed : कर्ज फेड नाहीतर पत्नीला माझ्या घरी सोड, सावकाराच्या जाचाने दुकानदाराची आत्महत्या; चिठ्ठीत लिहिलं, वर्गणी काढून क्रियाकर्म करा

SCROLL FOR NEXT