फोटो 
नांदेड

नांदेड रेल्वेच्या रेसुबची सवारी बुलेटवर, गुन्हेगारांमध्ये धडकी

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात रेल्वे सुरक्षा बलाच्याच्या विविध ठिकाणी तुकड्या आहेत. हे जवान रेल्वे गाड्यांमध्ये, रेल्वे स्थानकावर आपले कर्तव्य निभावत असतात. प्रसंगी त्यांना गुन्हेगारांचा पाठलागही करावा लागतो. याकामी मदत व्हावी म्हणून विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन विनू देव यांनी आपल्या जवानांकरिता सात नवीन बुलेट दुचाकी उपलब्ध करून दिल्या आहेत.
 
बुधवारी (ता. २० ) विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना विभागीय कार्यालयात या नवीन मोटार सायकल वितरित केल्या. प्रवाश्यांची सुरक्षा आणि रेल्वे मालमत्तेचे रक्षण करणे हेच रेल्वे सुरक्षा बलाचे महत्वाचे काम आहे. तसेच हे काम विभागातील रेल्वे सुरक्षा विभाग चांगल्या रितीने पार पाडत असल्याबाबत त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा -  वेदनादायक : उपचाराला पैसे नसल्यामुळे तरुणीची आत्महत्या
 
दुचाकीसह हॅन्डग्लोज व इतर साहित्याचे वाटप
 
नांदेड विभागातील रेल्वे सुरक्षा बलाच्या च्या जवानांना कोरोनाच्या काळात कर्तव्य पार पाडतांना उपयोगी पडेल म्हणून व्‍यंकटेश सहकारी पतसंस्था म., शिक्षक क्लब आणि नेत्र रुग्णालयाचे गजानन पांपटवार  यांच्या माध्यमातून रेल्वे सुरक्षा जवानांना उपयोगी पडतील म्हणून ६०० हॅन्ड ग्लोव्हज दिले. जवानांना श्रमिक विशेष गाड्यांमध्ये सेवा बजावावी लागते. त्यावेळी त्यांना या हॅन्ड ग्लोव्हजचा उपयोग होईल. या स्वयंस्फूर्त मदतीबद्दल विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन विनू देव यांनी त्यांचे आभार मानले.

एक जूनपासून काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय

नांदेड रेल्वे विभागातून दररोज मोठ्या संख्येने मालवाहू व प्रवाशी सेवा देणाऱ्या रेल्वे देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात धावतात. या माध्यमातून हजारो प्रवाशी व कोट्यावधीचा माल रेल्वे विभाग दळणवळणाच्या माध्यमातून करत असते. मात्र कोरोनाच्या भयंकर साथीमुळे सध्या काही मालवाहू रेल्वे गाड्याशिवाय प्रवाशी वाहतुक करणाऱ्या सर्वच रेल्वे सेवा बंद आहेत. लॉकडाउनमध्ये या गाड्या आहे त्याच ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत. एक जूनपासून काही रेल्वे गाड्या सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Emotional Message : राहुल गांधी भावूक; वडिलांची आठवण काढत आई सोनिया गांधींसाठी खास संदेश

ZODIAC SIGNS: राग आला तरी लगेच शांत होतात! ‘या’ राशीनच्या मुली असतात मनाने खूप हळव्या; ओळखा स्वभाव!

Kas Plateau Flower Season 2026 : कास पठारावरील फुलांचा हंगाम 'या' तारखेपासून होणार सुरू; ऑनलाईन बुकिंग कधी? हुल्लडबाजी करणाऱ्यांना बसणार चाप

Latest Marathi News Live Update : ऑगस्टमध्ये मराठवाडा आणि विदर्भ कोरडे; सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची आशा

Ayushman Card : कोणताही प्रीमियम न भरता मिळवा फ्री Health Insurance, फक्त WhatsApp वर ‘Hi’ ... जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

SCROLL FOR NEXT