Nanded Registration facility in Collectorate for statement
Nanded Registration facility in Collectorate for statement sakal
नांदेड

नांदेड : निवेदनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणीची सुविधा

सकाळ वृत्तसेवा

नांदेड : औरंगाबाद विभागासाठी समर्पित आयोगाचा भेटीचा कार्यक्रम २२ मे रोजी सकाळी साडेनऊ ते साडेअकरा ही वेळ निश्चित करण्‍यात आली आहे. त्‍यानुसार ज्‍या नागरीकांना, संस्‍थाना समर्पित आयोगाची भेट घ्‍यावयाची आहे अथवा निवेदन द्यावयाचे आहे. अशा नागरिकांनी, संस्‍थांनी त्‍यांचे, संस्‍थेचे नाव, पत्‍ता, दुरध्‍वनी क्रमांक व ई - मेल इत्‍यादी माहितीसह नोंदविणे आवश्‍यक आहे. ही नोंदणी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारपर्यंत कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत इच्‍छुकांनी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

महाराष्‍ट्रातील जिल्‍हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायती या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थामध्‍ये नागरिकांच्‍या मागास प्रवर्गास (ओबीसी, व्हिजेएनटी) आरक्षण देण्‍यासाठी सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्देशाप्रमाणे महाराष्‍ट्र शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे.

महाराष्‍ट्र राज्‍यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील नागरिकांच्‍या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्‍यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्विकारण्‍यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्‍या भेटीच्‍या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत, यासाठी संबंधित विभागीय आयुक्‍त कार्यालयात आपल्‍या नावाची नोंदणी भेटीच्‍या दिनांकापूर्वी करावी, असे आयोगातर्फे निवेदन करण्‍यात आले आहे.

जिल्‍ह्यातील नांदेड वाघाळा महापालिका तसेच नगरपालिकांमध्ये देगलूर, मुखेड, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद, उमरी, भोकर, मुदखेड, हदगाव, लोहा, कंधार, किनवट, नगरपंचायत नायगाव, अर्धापूर, हिमायतनगर, माहुर या १७ नागरी क्षेत्रासाठी नगरपालिका प्रशासन विभाग, दुसरा मजला, जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे, तसेच ग्रामीण भागासाठी उपजिल्‍हाधिकारी (सामान्‍य), जिल्‍हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कक्ष (हेल्‍प डेस्‍क) स्‍थापन करण्‍यात आला आहे. ता. २१ मे पर्यंत कार्यालयीन दिवशी, कार्यालयीन वेळेत इच्‍छुकांनी नोंदणी करणे आवश्‍यक राहील, असेही आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभा माझी पण हवा तुमची.. ! मोदींनी देखील केलं त्या दोघांच कौतुक, यूपीतल्या रॅलीमध्ये काय घडलं?

व्हिडिओ एडिटर कसा बनला केजरीवालांचा PA? स्वाती मालीवाल मारहाण प्रकरणी बिभव कुमारांना समन्स

Sunil Chhetri Net Worth: ऑडी, फॉर्च्युनर सारख्या कारचा मालक, बेंगळुरूमध्ये आलिशान घर; फुटबॉलपटू सुनील छेत्रीची संपत्ती किती?

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT